28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरराजकारणहिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे सहा आमदार अपात्र!

हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे सहा आमदार अपात्र!

पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत विधानसभा अध्यक्षांची कारवाई

Google News Follow

Related

हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या सहा बंडखोर आमदारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत काँग्रेसच्या सहा आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.विधानसभा अध्यक्ष सतपाल पठानिया यांनी हा निर्णय दिला.राज्यसभा निवडणुकीत बंडखोरी करुन क्रॉस व्होटींग केल्यामुळे सर्व सहा बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

कारवाई करण्यात आलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे आमदार सुधीर शर्मा (धर्मशाला), राजिंदर राणा (सुजानपुर), इंद्र दत्त लखनपाल (बदसर), रवी ठाकूर (लाहौल स्फिती), चैतन्य शर्मा (गगरेट), देविंदर भुट्टो (कुटलेहर) या आमदारांचा समावेश आहे.या सहाही आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

न्यायाधीशाला योग्य प्रकारे सॅल्युट न करणे भोवले

हिंसाचार करणाऱ्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट, व्हिसा रद्द करणार

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे बीसीसीआयचे वार्षिक कंत्राट रद्द

तृणमूलचा नेता शेख शहाजहान याला अखेर अटक

या संदर्भात विधानसभा अध्यक्ष कुलदीप पठानिया यांनी सांगितले की, या सहा आमदारांनी पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केले.त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतरविरोधी कायद्याची तरतूद लागू होते.त्यामुळे त्यांचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहे, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.दरम्यान अपात्र ठरलेले काँग्रेसचे बंडखोर आमदार उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय अंतिम नसून त्याला उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र केल्यानंतर मुख्यमंत्री सुक्खू सरकारची पुढील रणनीती कशी असेल ते पाहावे लागेल.काँग्रेसच्या सहा आमदारांना सदस्यत्व संपल्यानंतर सभागृहात ६२ सदस्य उरतील.सरकारला बहुमतासाठी ३२ आमदारांची गरज आहे, तर आता काँग्रेसकडे ३४ आमदार शिल्लक आहेत.
तसेच भाजपकडे सध्या २५ आमदार आहेत आणि ३ अपक्ष आमदारांचा देखील पाठिंबा भाजपला मिळाला आहे.काँग्रेसकडे अजूनही संख्याबळ आहे, मात्र, पक्षातील फूट आणि गटबाजीचे दर्शन अजूनही दिसत असल्याने काँग्रेस सरकार टिकेल की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा