26 C
Mumbai
Tuesday, December 10, 2024
घरविशेष'योगी आदित्यनाथ धमकी प्रकरणी फातिमा खानला घेतले ताब्यात'

‘योगी आदित्यनाथ धमकी प्रकरणी फातिमा खानला घेतले ताब्यात’

मुंबई पोलीस आणि एटीएस पथकाची संयुक्त कारवाई

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी (३ नोव्हेंबर) एका २४ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई करत एका मुस्लीम महिला ताब्यात घेतले आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, फातिमा खान असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरममधून तिला अटक करण्यात आली. ती तिच्या कुटुंबासह याठिकाणी वास्तव्यास आहे. फातिमाने माहिती तंत्रज्ञान विषयात बॅचलर पदवी घेतली आहे. पोलिसांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, फातिमा खान सुशिक्षित आहे, परंतु ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे.

हे ही वाचा : 

‘असदुद्दीन ओवेसींकडून मुस्लिमांना भडकवण्याचे काम’

‘योगी आदित्यनाथ १० दिवसात राजीनामा द्या, अन्यथा बाबा सिद्दिकी सारखी हत्या करू’

केंद्रीय गृहमंत्र्यांवरील आरोपांप्रकरणी भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्याला बजावले समन्स

दुबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात सापडली काडतुसे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धमकीनंतर अधिकाऱ्यांनी दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) सतर्क केले होते. एटीएसने या धमकीशी संबंधित असलेल्या महिलेला उल्हासनगरमध्ये शोधून काढण्यात यश मिळवले. स्थानिक पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत एटीएसच्या पथकाने महिलेच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली. प्राथमिक माहिती गोळा केल्यानंतर तिला पुढील चौकशीसाठी स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

अधिक चौकशीसाठी फातिमाला मुंबईत आणण्यात आले. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने पुष्टी केली की, तिला अटक झाली नाही; त्याऐवजी, तिला चौकशीनंतर नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच महिलेची मानसिक आरोग्य तपासणी देखील केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शनिवारी (२ नोव्हेंबर) संध्याकाळी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला होता. ‘योगी आदित्यनाथ १० दिवसात राजीनामा द्या, अन्यथा बाबा सिद्दिकी सारखी हत्या करू’, असे मेसेजमध्ये म्हटले होते. या मेसेजनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
211,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा