30 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरविशेषकॅलिफोर्नियात ५.० तीव्रतेचा भूकंप; ४० हून अधिक धक्के

कॅलिफोर्नियात ५.० तीव्रतेचा भूकंप; ४० हून अधिक धक्के

विमानाचे लँडिंग थांबवले

Google News Follow

अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या किनारपट्टीजवळ सकाळी ५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे संपूर्ण परिसराला जोरदार धक्के बसले. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाचे लँडिंग थांबवावे लागले. विमानतळाच्या टर्मिनलमधील काचा फुटल्या. याशिवाय, भूकंपानंतर ४० हून अधिक धक्केही जाणवले. भूकंपाचे तीव्र धक्के बसताच नागरिक घरांमधून आणि दुकानांमधून घाबरून बाहेर पडले. किनारपट्टीवरील रहिवासी तसेच खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिकही सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावले. मात्र, स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही मोठ्या इमारतीचे नुकसान झालेले नाही. तसेच, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेच्या (यूएसजीएस) माहितीनुसार, भूकंपाचा पहिला धक्का सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी बसला. या भूकंपाचे केंद्र मॅनहॅटन बीचपासून पश्चिम-दक्षिण-पश्चिम दिशेला सुमारे ३.७ मैल अंतरावर होते. जमिनीखाली सुमारे ७.६ मैल खोलीवर भूकंपाचे धक्के जाणवले.दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये भूकंप होणे ही नवीन बाब नाही. मात्र, यावेळी धक्क्यांची तीव्रता अधिक असल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकही हादरले. लॉस एंजेलिसमध्ये दहा वर्षांहून अधिक काळानंतर एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला आहे.

अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेच्या आकडेवारीनुसार, २०१४ नंतर या परिसरात झालेला हा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप होता. २०१४ मध्ये ऑरेंज काउंटीमधील ला हाब्रा येथे ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. मात्र, तज्ज्ञांच्या मते, शनिवारी झालेला भूकंप २०१४ मधील भूकंपाच्या तुलनेत अधिक खोलीवर झाला. २०१४ मधील भूकंप जमिनीच्या तुलनेत कमी खोलीवर झाला होता.कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या भूकंपशास्त्रज्ञांनी मुख्य भूकंपानंतर किमान ४० लहान-मोठे धक्के नोंदवले.

वृत्तानुसार, प्रशासनाने पुढील काही दिवसांत आणखी धक्के जाणवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेने ४.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा आणखी एक भूकंप होण्याची ३० टक्के शक्यता वर्तवली होती. दरम्यान, सकाळी ११ वाजून ४१ मिनिटांनी ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र मॅनहॅटन बीचपासून दक्षिण-पश्चिम दिशेला सुमारे ३.७ मैल अंतरावर होते.

हे ही वाचा:

दीड लाख लोकांच्या उपस्थितीत पार पडले ‘राष्ट्रवंदनम’

झारखंडमध्ये भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू

लग्नसराई – सणासुदीच्या खरेदीमुळे महागाईचा धोका वाढणार

काँग्रेसच्या तंबूत घबराट का?

भूकंपाच्या वेळी लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेल्टा एअरलाईन्सच्या एका विमानाला लँडिंग करण्यापूर्वीच पुन्हा हवेत उड्डाण करावे लागले. विमानाने उतरण्याऐवजी पुन्हा आकाशात घिरट्या घातल्या. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इमारतींची तपासणी सुरू होती. मात्र, धावपट्ट्यांच्या तपासणीत कोणतीही समस्या आढळली नाही. तसेच, विमानांच्या उड्डाणांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला नाही. या भूकंपात कोणीही जखमी झाले नसून मोठ्या नुकसानीचीही नोंद झालेली नाही. वृत्तानुसार, भूकंपामुळे किनारपट्टीवरील अनेक भागांतील दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला. सांता मोनिकामध्ये पत्रकार ब्रॅड पार्क्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे झाडे जोरदार हलत होती. इमारतींनाही मोठ्या आवाजासह हादरे बसत होते. तर रेडोंडो बीच येथे ४.५ तीव्रतेच्या दुसऱ्या भूकंपामुळे वाहनांचे अलार्म वाजू लागले. हा प्रकार वॉन्स किराणा दुकानाच्या पार्किंग परिसरात घडला.

दरम्यान, मॅनहॅटन बीच प्रशासनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील मॅनहॅटन बीच पिअर बंद करण्यात आल्याची माहिती दिली. वृत्तानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना या संरचनेपासून दूर राहण्याचे आवाहन केले असून, बंदीचे फलक आणि सूचनांचे पालन करण्याचेही निर्देश दिले आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा