29 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरविशेष... म्हणून ९०व्या वर्षी ते बनले सरपंच!

… म्हणून ९०व्या वर्षी ते बनले सरपंच!

Google News Follow

Related

कोल्हापूरमधील एका गावातील ९० वर्षीय रहिवासी बापू पिरा कांबळे यांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.

सन १९६२ पासून कोल्हापूर मधील ऐतिहासिक गाव माणगावच्या सरपंच पदासाठीच्या सर्व निवडणुकांमध्ये कांबळे हे अयशस्वी ठरले होते. मात्र, गुरुवारी (७ ऑक्टोबर) कांबळे यांना शासनाच्या परवानगीने एका आठवड्यासाठी सरपंच पदाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी मिळाली आहे.

‘राजकीय प्रक्रियेत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे प्रत्येक नागरिकाने सहभाग घेतलाच पाहिजे. कोणतेही पद सांभाळत नसताना लोकांची सेवा केली आणि आता सरपंच पदाची जबाबदारी असताना गावातील सर्वांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असेल,’ असे बापू कांबळे यांनी सांगितले. कांबळे हे गावातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती असून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर अनुयायी आहेत. त्यांचा लोकशाही व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे. त्यांच्या सरपंच पदाच्या जबाबदारीमध्ये ते बैठका घेऊ शकतात, चर्चा करू शकतात, निर्णयही देऊ शकतात. मात्र, ते कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ शकत नाहीत.

हे ही वाचा:

कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत महिला संघाची सुवर्णकमाई!

मुस्लिम शिक्षकांना वेगळे करून काश्मीरात हिंदू, शीख शिक्षकांची हत्या

देशभर सुरु आदिशक्तीचा जागर

दादर स्थानकाचा होणार कायापालट; ‘हे’ बदल होणार

गावचे विद्यमान निवडून आलेले सरपंच राजू मगदूम यांनी ‘टाइम्स’शी बोलताना सांगितले की, ‘कांबळे हे अनेकदा कार्यालयात येत असत आणि तेव्हा त्यांच्या तोंडून अनेकदा सरपंच बनण्याची इच्छा असल्याचे ऐकले होते. त्यानंतर मग आम्ही त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. त्यानुसार कोल्हापूरच्या जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही परवानगी मिळवण्यासाठी पत्र लिहिले. त्यानंतर त्यांनीही एक आठवडा त्यांना सरपंच पदाची जबाबदारी देण्यासाठी परवानगी दिली.’

माणगावला ऐतिहासिक महत्त्व आहे. या गावात डॉ. आंबेडकर शाहू महाराजांसोबत पहिल्यांदा जनतेसमोर आले होते. डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुतळा गावामध्ये बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तेव्हा त्यासाठी तयार केलेल्या समितीमध्ये कांबळे यांचा सहभाग होता. आता त्या समितीच्या सदस्यांपैकी फक्त कांबळेच हयात आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा