28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरविशेषदादर स्थानकाचा होणार कायापालट; ‘हे’ बदल होणार

दादर स्थानकाचा होणार कायापालट; ‘हे’ बदल होणार

Related

मुंबईतील गजबजलेले रेल्वे स्थानक अशी ओळख असणाऱ्या दादर रेल्वे स्थानकावरून रोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. मध्य आणि पश्चिम उपनगरीय लोकल गाड्या तसेच दोन्ही मार्गांवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांना दादरला थांबा असल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. स्थानकाबाहेरील परिसरावरही या गर्दीचा चांगलाच परिणाम दिसून येत असतो. स्थानक परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडी आता लवकरच कमी होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकात महत्त्वाचे बदल करण्याची योजना रेल्वेने आखली आहे.

सध्या दादर स्थानकात पश्चिम रेल्वेचे सात आणि मध्ये रेल्वेचे आठ असे एकूण १५ प्लॅटफॉर्म्स आहेत. तसेच एकूण सहा पादचारी पूल आहेत. दादर स्थानकतून दररोज सुमारे सहा लाख प्रवासी प्रवास करत असतात. प्रवाशांसाठी स्थानकात येण्या-जाण्यासाठी योग्य ठिकाणी गेट्स तयार करणे, टिळक पुलाचे सहा पदरी रुंदीकरण करणे, प्रवशांसाठी पिक अप आणि ड्रॉप सुविधा तयार करणे, प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांचे प्रवासी आणि उपनगरीय रेल्वेचे प्रवासी असे दोन स्तर तयार करून त्याप्रमाणे सोय करणे, चार व्यावसायिक इमारती बांधणे, पार्किंगसाठी सुविधा, मधला एक पादचारी पूल वगळता इतर सर्व पूल पाडले जातील, अशा काही योजना रेल्वेने आखल्या आहेत.

हे ही वाचा:

महिलांसाठी हा घेण्यात आला ‘बेस्ट’ निर्णय

महाराष्ट्रात १०५० कोटींचा भ्रष्टाचार

जे जे इन्स्टिट्यूटमधून गायब झाले कॅमेरे, महागड्या लेन्स

मोदींच्या बळाचे गमक काय?

स्थानकाची रचना ही वेगळ्या पद्धतीने असेल आणि सर्व आधुनिक सोयी सुविधाही प्रवाशांना उपलब्ध असतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे अनिल कुमार लाहोटी यांनी ‘टाइम्स’शी बोलताना दिली. ही योजना सध्या प्रस्तावाच्या टप्प्यात आहे त्यामुळे निश्चित मुदत सांगणे खूप लवकर असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा