34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरविशेषरस्त्याच्या कामांसाठीची महापालिकेच्या फेरनिविदा

रस्त्याच्या कामांसाठीची महापालिकेच्या फेरनिविदा

Related

मुंबई महापालिकेने मागील महिन्यात रद्द करण्यात आलेली रस्त्याच्या कामांसाठीची फेरनिविदा काढली आहे. रस्ते कंत्राटदारांनी अंदाजापेक्षा ३० टक्के खाली उद्धृत केल्यानंतर गेल्या महिन्यात विभाग प्रमुखांनी या कामांना लाल झेंडा दाखवला होता. म्हाडा आराखड्याप्रमाणे असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लवकरच निविदा काढण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कामासाठी दोन हजार कोटीपेक्षा जास्त खर्च होणार असल्याचा अंदाज आहे.

गुरुवारी पूर्व, पश्चिम उपनगरे आणि शहरी भागातील रस्त्यांसाठी तीन श्रेणींमध्ये निविदा काढण्यात आल्या. पालिकेने इच्छुकांना निविदा भरण्यासाठी २८ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. निविदांमध्ये काही कठोर अटी घालण्यात आल्या आहेत, त्यामुळे इच्छुकांनी निविदा भरण्यासाठी जास्तीचा वेळ मागितला तर रस्ते दुरुस्तीसाठीही उशीर होऊ शकतो, असे काही नगरसेवकांनी सांगितले.

हे ही वाचा:

पाकिस्तानला मिळणारी मदत तातडीने थांबवा!

मुस्लिम शिक्षकांना वेगळे करून काश्मीरात हिंदू, शीख शिक्षकांची हत्या

‘प्ले ऑफ’ मध्ये जागा मिळवणार मुंबईचा संघ? वाचा विजयाचे सूत्र!

दादर स्थानकाचा होणार कायापालट; ‘हे’ बदल होणार

नवीन निविदांच्या अटींमध्ये बदल करण्यात आले आहेत. निविदांमध्ये भाग घेणाऱ्या कंत्राटदार कंपनीला रस्त्यांच्या कामाचा पूर्वअनुभव असणे आवश्यक असणार आहे. फक्त नागरी बांधकामाचा अनुभव असून उपयोग नाही, अशी अट  घातल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर ८० टक्के रक्कम देण्यात येईल आणि उर्वरित २० टक्के रक्कम ही रस्त्यांच्या हमी कालावधीमध्ये हप्त्यांमध्ये दिली जाईल.

रस्त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ८०:२० अशा प्रकारे निधी दिल्यास सोयीचे असेल असे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलसारू यांनी ‘टाइम्स’शी बोलताना सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा