28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरविशेषमुंबई विद्यापीठातील वसतिगृहाला स्वांतत्र्यवीर सावरकरांचे नाव

मुंबई विद्यापीठातील वसतिगृहाला स्वांतत्र्यवीर सावरकरांचे नाव

Google News Follow

Related

मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला स्वांतत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. यासंबंधीच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या होत्या. काही विद्यार्थी संघटनेच्या मागणीनंतर वसतिगृहाचा नामकरणाचा वाद पेटला होता. छत्रपती शाहू महाराजांचे नाव द्यायचे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव यावरून वाद रंगला होता.

काही दिवसांपूर्वी या वसतिगृहाचे उद्घाटन झाले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या भाषणात या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची सूचना केली होती. त्यानंतर छात्रभारती तसेच इतर विद्यार्थी संघटनांनी या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याचे पत्र कुलगुरूंना दिले होते.

विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाला अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्यात यावं अशी विद्यार्थी संघटनांची मागणी होती.

हे ही वाचा:

मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द

टॉप पाच आमदारांमध्ये अतुल भातखळकर

बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने

“तरुण देशाचे तर भारत जगाच्या विकासाचे इंजिन”

त्यानंतर २८ जुलै रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली, त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाला मंजूरी देण्यात आली. या वादात युवा सेनेने तटस्थ भूमिका घेतली, त्यांच्याकडून सावरकर आणि शाहू महाराज हे दोघेही आमच्यासाठी आदरणीय असल्याचे त्यांनी सांगितले. तर अभविपच्या मागणीला यश आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा