गाझियाबाद पोलिसांनी इमरान नावाच्या एकाला हिंदू विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार करून तिला इस्लाम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीने ९ जानेवारी रोजी महिलेला त्याच्यासोबत जाण्याचे आमिष दाखवले. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत इम्रानला अटक केली. तसेच यातून महिलेची सुटका करण्यात आली आहे.
पीडितेच्या पतीच्या तक्रारीवरून इम्रानविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत इम्रानवर पत्नीला घर सोडण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की इम्रानने महिलेची एका मौलवीशी ओळख करून दिली आणि तिला नमाज अदा करण्यास प्रोत्साहित केले. तिचे नाव बदलून इस्लाम स्वीकारण्याचाही तिच्यावर दबाव होता. शिवाय, पीडितेने दागिने आणि रोख रक्कम घेऊन घर सोडल्याचा आरोप पतीने केला आहे.
हेही वाचा..
जयेश मेस्त्री लिखित, दिग्दर्शित ‘जादूचा दिवा’ बालनाट्याला घवघवीत यश
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना कोणत्या देशातून सर्वाधिक पसंती? आकडेवारी काय सांगते
रिलायन्स भारतात उभारणार जगातील डेटा सेंटर्सच्या तुलनेत तिप्पट क्षमता असलेले सेंटर!
ममता कुलकर्णी महामंडलेश्वर बनणार!
भारतीय नया संहितेच्या कलम ८७ आणि उत्तर प्रदेश बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर प्रतिबंध कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत २४ जानेवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. पतीने तक्रारीत म्हटले आहे की, खोडा येथील रहिवासी असलेला इम्रान हा आपल्या पत्नीला लग्नापूर्वीपासून ओळखत होता. अनेक महिन्यांपासून तो महिलेच्या संपर्कात होता. ९ जानेवारीच्या रात्री ही महिला बेपत्ता झाली. पतीने स्वतःहून तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यानंतर त्याने विजय नगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.
पतीने इम्रानच्या फोन नंबरसारखी माहिती दिली. त्याच्यामुळेच त्याला अटक करण्यात आली. महिलेने तिच्या निवेदनात म्हटले आहे की, इम्रान तिला दिल्ली आणि गाझियाबादमधील अनेक मशिदींमध्ये घेऊन गेला. ती बेपत्ता असताना त्याने तिला विविध हॉटेलमध्ये ठेवले. पोलिस उपायुक्त राजेश कुमार यांनी पुष्टी केली की इम्रानला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी महिलेला दिल्लीतील मशिदींसह अनेक ठिकाणी नेले आणि हॉटेलमध्ये ठेवले. मात्र, आरोपीने धर्मांतराचे आरोप फेटाळले आहेत. आरोपीला न्यायालयात हजर करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
