32 C
Mumbai
Monday, March 17, 2025
घरविशेषरिलायन्स भारतात उभारणार जगातील डेटा सेंटर्सच्या तुलनेत तिप्पट क्षमता असलेले सेंटर!

रिलायन्स भारतात उभारणार जगातील डेटा सेंटर्सच्या तुलनेत तिप्पट क्षमता असलेले सेंटर!

गुजरातच्या जामनगरमध्ये सुरू होणार प्रकल्प

Google News Follow

Related

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय सध्या प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडत आहे. पुढील काळात एआयचा वापर आणि त्याचा सर्वच क्षेत्रातील हस्तक्षेप आणखी वाढत जाईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. एआय तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत भारतानेही आपले हात पाय पसरण्यासाठी सुरुवात केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे गुजरातमधील जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर उभारणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भारताच्या वेगाने वाढणाऱ्या एआयच्या क्षमतेला एक मजबूत पाया मिळणार आहे. डेटा सेंटर देशातील डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि त्याच वेळी, जागतिक एआय शर्यतीत भारताला अधिक स्पर्धात्मक बनण्यास मदत करणार आहे.

सध्या आपल्याकडील माहिती म्हणजेच डेटा साठवून ठेवण्यासाठी ‘क्लाऊड स्टोअरेज’चा वापर केला जातो. यात आपला सर्व डेटा एका सर्व्हरमध्ये ऑनलाइन सुरक्षितपणे संग्रहित केला जातो. जो आपण कुठेही आणि कधीही वापरू शकतो. क्लाऊड स्टोरेज डेटा सुरक्षित स्टोअर करण्याचे व्हर्च्युअल माध्यम आहे. याच्या साहाय्याने फोन आणि कॉम्प्युटर मधील डेटा कोणत्याही कंपनीच्या क्लाऊड स्टोरेज सर्व्हर मध्ये स्टोअर करू शकतो. याचं माहितीच्या आधारे एआय तंत्रज्ञान काम करत असते. या एआयच्या स्पर्धेत भारताला वेगाने घौडदौड करण्यासाठी स्वतःचे डेटा सेंटर्स असणे आवश्यक आहे. भविष्यात या क्षेत्राचा व्याप वाढणार असला तरी याचा पाया रचण्याचे काम रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आताच केले जात आहे.

गुजरातच्या जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. सध्या जगातील सर्वात मोठी डेटा सेंटर्स पाहिली आणि त्यांच्या क्षमतेचा विचार केला तर ती सर्व डेटा सेंटर्स ही एक गिगावॉट पेक्षा कमी क्षमतेची आहेत. पण, मुकेश अंबानी भारतात उभारत असलेल्या डेटा सेंटरची क्षमता ही तीन गिगावॉट इतकी असणार आहे. म्हणजे जगातील इतर सेंटर्सच्या तुलनेत ही क्षमता तिप्पट आहे. यामुळे भारताच्या डेटा सेंटर्सची क्षमताचं मुळात तिप्पट होणार आहे. एआयच्या स्पर्धात्मक युगात बरोबरी करायची असेल तर अशा सुविधांनी भारताला सज्ज करणं अत्यंत आवश्यक आहे आणि याचं पार्श्वभूमीवर अंबानी यांनी या क्षेत्रात उतरून हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

प्रत्येक क्षेत्रात होत असलेले डिजिटलायजेशन, ई कॉमर्स, सरकारी नियम अशा अनेक कारणांमुळे डेटा सेंटर्सची आवश्यकता भासू लागली आहे आणि ही सेंटर्स वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे. भविष्यातील एआयचे महत्त्व जाणून हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

अंबानी यांनी पाया रचण्याचा म्हणजेच डेटा सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला असला तरी यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची गरज भासणार आहे. हे डेटा सेंटर उभारण्यासाठी ऍडवान्स एआय सेमी कंडक्टरची आवश्यकता आहे. सध्या ही गरज केवळ NVIDIA कॉर्पोरेशन ही कंपनीचं पूर्ण करू शकणार आहे. इतर कंपन्या पण या चीप्स बनवतात पण या डेटा सेंटर्ससाठी लागणारी ऍडवान्स एआय सेमी कंडक्टर हीच कंपनी बनवते. त्यामुळे त्यांनी NVIDIA कंपनी सोबत भागीदारी केली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये, NVIDIA एआय समिट दरम्यान, रिलायन्स आणि NVIDIA ने भारतात एआयसाठीची पायाभूत सुविधा स्थापन करण्यासाठी भागीदारी केली असल्याची घोषणा करण्यात आली होती.

हे ही वाचा : 

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चा

अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांच्या हद्दपार मोहिमेला सुरुवात

२६/११ चा दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणणार

हमासच्या कैदेत असलेल्या चार महिला सैनिकांची सुटका होणार!

रिलायन्स कंपनीने त्यांच्या इतर उद्योग क्षेत्रात यापूर्वीच एआय वापरण्यास सुरुवात केली आहे. पण, डेटा सेंटरच्या व्यवसायात अंबानींच्या मोठ्या गुंतवणुकीमुळे त्यांच्या कंपनीला या उदयोन्मुख क्षेत्रात मोठा आणि लवकरचं पाय ठेवता येणार आहे.

डेटा सेंटरचा हा महत्त्वाचा प्रकल्प रिलायन्सला जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांच्या पंक्तीत नेऊन ठेवणार आहे. जे एआय सक्षम डेटा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहेत. अलीकडेच, ओरॅकल, ओपनएआय आणि सॉफ्टबँक यांच्या सहकार्याने यूएस-आधारित एआय पायाभूत सुविधांमध्ये १०० अब्ज डॉलर्स ते ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत एकूण गुंतवणूक असलेल्या ‘स्टारगेट’ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. आता मुकेश अंबानी यांचा हा डेटा सेंटरचा प्रकल्प भारताला एक वेगळी ओळख मिळवून देण्याचा तयारीत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा