अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चार दिवसांत त्यांनी अवैध स्थलांतरितांबाबत दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने लष्करी विमानांचा वापर करून बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी उड्डाणे सुरू केली आहेत. बेकायदेशीर स्थलांतरितांना मोठ्या प्रमाणावर हद्दपार करणे हे ट्रम्प यांच्या प्रचारातील प्रमुख निवडणूक आश्वासनांपैकी एक आहे. याबाबतच्या सरकारी आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरीही केली आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या सीमा धोरणांमुळे ५३८ अवैध स्थलांतरितांना आधीच अटक करण्यात आली आहे. लष्करी विमानांचा वापर करून स्थलांतरितांसाठी उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प संपूर्ण जगाला एक मजबूत आणि स्पष्ट संदेश देत असल्याचे बोलले जात आहे. जर तुम्ही बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केला तर तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा संदेश असल्याच्या चर्चा आहेत.
हे ही वाचा :
२६/११ चा दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणणार
हमासच्या कैदेत असलेल्या चार महिला सैनिकांची सुटका होणार!
अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा करणाऱ्या विष्णू गुप्ता यांच्या गाडीवर गोळीबार
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येताचं भारत योग्य पावले उचलेल!
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दोन लष्करी विमाने प्रत्येकी ८० स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेतून ग्वाटेमालाला गेले. “ग्वाटेमाला आणि युनायटेड स्टेट्स बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्यासाठी आणि सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहेत. आजपासून दोन उड्डाणे सुरू होत आहेत,” असे स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या टर्मसाठी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्याच्या काही दिवसांनंतर या कारवाईला सुरुवात झाली आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केलेल्यांची हद्दपारी हा मुद्दा ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेत आघाडीवर होती आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी पहिल्या दिवशी स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशांपैकी हा एक आदेश होता. त्यांच्या २० जानेवारीच्या कार्यकारी आदेशाने पेंटागॉनला युनायटेड स्टेट्सच्या दक्षिणेकडील सीमेवर संपूर्ण ऑपरेशनल नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक तेवढे सैन्य पाठवण्याची सूचना केली आहे. तसेच त्यांनी दक्षिणेकडील सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याच्या आदेशावरही स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी या भागात सैन्य तैनात करण्याची घोषणा केली आहे.