वंदे भारत ट्रेनची श्री माता वैष्णो देवी कटरा स्थानक ते श्रीनगर स्थानकापर्यंत जगातील सर्वात उंच चिनाब पुलावरून पहिली चाचणी घेण्यात आली आहे. त्याचे व्हिडीओ आता समाज माध्यमात प्रचंड प्रमणावर व्हायरल होत आहेत. ही ट्रेन अंजी खड्डा पुलावरूनही जाईल. हा भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे.
जम्मू काश्मीर खोऱ्यातील थंड हवामानात प्रवास करताना प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ट्रेनची रचना करताना हवामान अनुकूलतेचाही विचार करण्यात आला आहे. ट्रेन -३० अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात सुद्धा चालू शकते. चेअर-कार ट्रेनमध्ये पाणी गोठण्यापासून रोखण्यासाठी प्रगत हीटिंग सिस्टम आणि बायो-टॉयलेट टाक्या आहेत.
हेही वाचा..
न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची श्रद्धांजली
ममता कुलकर्णी महामंडलेश्वर बनणार!
२६/११ चा दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणणार
हमासच्या कैदेत असलेल्या चार महिला सैनिकांची सुटका होणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी निदर्शनास आणून दिले होते की इतर अनेक राष्ट्रांनी भारतातून अर्ध-हाय स्पीड वंदे भारत ट्रेन्स घेण्यास स्वारस्य व्यक्त केले आहे. अनेकांनी ‘मेक इन इंडिया’ यशोगाथा म्हणून पाहिलेल्या वंदे भारत ट्रेनने कवच तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सुविधांसारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा केल्या आहेत, ज्यात अपंग व्यक्तींसाठी सुलभ शौचालये आणि एकात्मिक ब्रेल चिन्हे यांचा समावेश आहे.