इस्रायल आणि हमास यांच्यात अखेर युद्धविरामासाठी करार झाला असून याअंतर्गत ओलिसांची सुटकाही केली जात आहे. अशातच आता हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. यानंतर हमासकडून ओलिस ठेवलेल्या चार महिला सैनिकांची नावे मिळाल्याची पुष्टी इस्रायलने केली आहे. या महिला सैनिकांना चालू युद्धविराम कराराचा भाग म्हणून इस्रायलमध्ये परत पाठवले जाणार आहे.
हमासने करीना एरिव्ह (वय २० वर्षे), डॅनिएला गिलबोआ (वय २० वर्षे), नामा लेव्ही (वय २० वर्षे) आणि लिरी अल्बाग (वय १९ वर्षे) यांना सोडणार असल्याचे सांगितले होते. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी या चार महिलांच्या कुटुंबियांना याबद्दल माहिती दिली आहे. तसेच गाझामध्ये ओलिस ठेवलेल्या अर्बेल येहूद या महिलेलाही शनिवारच्या सुटकेमध्ये समाविष्ट केले जाण्याची अपेक्षा केली होती. हमासने येहुद हिला तिच्या किबुत्झ नीर ओझ येथील घरातून उचलून नेले होते. या २९ वर्षीय ओलिस ठेवलेल्या येहूदची सुटका करण्याची मागणी इस्रायलने केली होती. मात्र, अद्याप यावर हमासकडून प्रतिक्रिया आलेली नाही.
यापूर्वी २० जानेवारी रोजी इस्रायलवरील हल्ल्यादरम्यान बंधक बनवलेल्या तीन ओलिसांची हमासने सुटका केली. गाझामध्ये ४७१ दिवस कैदेत राहिल्यानंतर या तीन महिला इस्रायलला परतल्या आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी भेट घेतली होती. या करारांतर्गत रोमी गोनेन (वय २४ वर्षे) एमिली डमारी (वय २८ वर्षे) आणि डोरेन स्टेनब्रेचर (वय ३१ वर्षे) या तीन जणांची सुटका झाली. तर, इस्रायलने ९० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली.
हे ही वाचा :
अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा करणाऱ्या विष्णू गुप्ता यांच्या गाडीवर गोळीबार
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येताचं भारत योग्य पावले उचलेल!
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश, भोंगे उतरविण्याची जबाबदारी पोलिसांचीच!
येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार!
कराराच्या ४२ दिवसांच्या पहिल्या टप्प्यात सर्व ३३ ओलिसांची सुटका करण्याच्या बदल्यात, इस्रायल, पहिल्या टप्प्याच्या अखेरीस, प्राणघातक दहशतवादी हल्ल्यांसाठी अनेक जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या १,९०४ पॅलेस्टिनी कैदी आणि बंदिवानांना सुपूर्द करणार आहे. या करारांतर्गत नवीन सुटका शनिवारी होणार आहे, जेव्हा आणखी चार महिला ओलिसांची सुटका केली जाईल. कराराच्या पहिल्या टप्प्यात मुक्त केले जाणारे सर्व ३३ ओलिस हे महिला, मुले, ५० वरील पुरुष आणि जखमी पुरुष असणार आहेत.