28 C
Mumbai
Saturday, March 22, 2025
घरविशेषयेत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार!

येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार!

महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची माहिती

Google News Follow

Related

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यरत होणा-या सौर उर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असून घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक यांनाही मोठा फायदा होणार आहे. सौर उर्जा प्रकल्पांमुळे आगामी पांच वर्षांत १०० युनिट पर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर ५ रु. ८७ प्रति युनिट पर्यंत तर १०१ ते ३०० युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर ११.८२ रु. प्रति युनिट पर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होतील, एक एप्रिल पासून महावितरण च्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्याटप्प्याने मिळू लागतील. अशी माहिती महावितरणचे स्वतंत्र संचालक व भाजपा प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी शुक्रवारी (२४ जानेवारी) दिली.

१०० युनिट पर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर ५ रु. ८७ पर्यंत तर १०१ ते ३०० युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचा दर ११.८२ रु. पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणने राज्य वीज नियामक आयोगापुढे ठेवला असल्याचेही पाठक यांनी नमूद केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सौर ऊर्जा निर्मितीच्या धडाकेबाज कार्यक्रमामुळेच शेतकरी , घरगुती व औद्योगिक ग्राहकांचा फायदा होणार असल्याचे पाठक यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेमुळे राज्यात आगामी दोन वर्षांत १६ हजार मेगावॅट एवढी सौर वीज निर्मिती होणार आहे. त्याचा मोठा फायदा महावितरण ला होणार आहे.

हे ही वाचा : 

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश, भोंगे उतरविण्याची जबाबदारी पोलिसांचीच!

गुजरातमध्ये गोराक्षकावर हल्ला करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या

अकबर, औरंगजेब हे आपले नायक नाहीत!

संजय राऊत विदुषक, उद्धव ठाकरेंना रसातळाला नेण्याचे काम केलं!

महावितरण चा सरासरी वीज पुरवठ्याचा दर कमी होणार असल्यामुळे १०० युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांचे वीज दर ७ रु. ६५ पैशा पासून (प्रती युनिट) ५ रु. ८७ पैसे पर्यंत म्हणजेच २३ टक्क्यांनी कमी होतील तर १०१ ते ३०० युनिट वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांचे दर सरासरी १३.४९ रु. प्रति युनिट रु.११.८२ पर्यंत म्हणजेच १२ टक्क्यांनी कमी होतील, अशी आशाही पाठक यांनी व्यक्त केली. औद्योगिक ग्राहकांसाठीच्या सर्व सवलत, प्रोत्साहन योजना चालू ठेवण्यात येतील तसेच औद्योगिक ग्राहकांना क्रॉस सबसिडी देण्याची गरज पडणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे अनेक फायदे पुढील पाच वर्षांत ग्राहक आणि महावितरण ला होणार आहेत. महावितरण चा सरासरी वीज पुरठ्याचा दर सध्याच्या ९ रु. ४५ पैसे या दरावरून २०२९ – ३० पर्यंत ९ रु. १४ पर्यंत खाली येणार आहे, असे पाठक यांनी सांगितले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा