उबाठा गटाचे खासदार हे संजय राऊत विदुषक असून उद्धव ठाकरेंना रसातळाला नेण्याचे काम त्यांनी केले असल्याचे भाजपा मंत्री नितेश राणे म्हटले आहे. भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेला नितेश राणे प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्री नितेश राणे म्हणाले, संजय राऊत यांसारख्या विदुषकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करू नये. राज्याचे महसूल मंत्री असणारे बावनकुळे एक यशस्वी प्रद्देशाध्यक्ष आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला विधानसभेत फार मोठे यश मिळाले आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवला आहे. उद्धव ठाकरेंना रसातळाला नेण्याचे काम संजय राऊतांनी केल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
शरद पवार महाराष्ट्राला हिशोब द्या! १० वर्षे केंद्रीय कृषी मंत्री असताना काय केलेत?
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम संपन्न
विरोधी पक्षातील १० खासदारांचे निलंबन
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आयएएस अधिकारी पूजा सिंघलना सोरेन सरकारने घेतले नोकरीत
आक्षेपार्ह भाषेमध्ये संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. बावनकुळे नव्हे तर ते रावणकुळे आहेत, संजय राऊत म्हणाले. ६०० कोटींचा भूखंड १ रुपयाला घेतला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ईडी, सीबीआय कुठे आहे, बावनकुळे यांना अटक केली पाहिजे. यांना महसूल मंत्री दिले हा मोठा गुन्हा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
भाजपा महिला आमदार चित्रा वाघ यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. चित्रा वाघ म्हणाल्या, शिल्लक सेनेच्या उरल्या सुरल्या विश्वाचे विश्वगुरू, तुमची बावन्न कुळे जन्माल आली तरी तुम्हाला महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची थोरवी समजणार नाही.
तुम्ही आणि तुमचे नेते यांची वृत्तीच रावणासारखी असुरी असल्याने वारंवार तुम्ही गरळ ओकत आहात.
स्वयंघोषित संपादक तथा घरगड्याने आमच्या उच्च नेत्यांवर बोलणं आणि बिनबुडाचे आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखं आहे. राजकारणात तुमचं अस्तित्व संपत चालले म्हणून आलेली विषण्णता तुमच्या बोलण्यात जाणवते… त्यामुळे ह्या असह्य बेताल आणि असंस्कृत शब्दांचा जो काही बाजर मांडत आहात तो बंद करा.
खरंतर आज मा. उच्च न्यायालयाने मशिदी वरच्या भोंग्यावर बंदी आणली तशी गांजा फुंकून वाजणाऱ्या या भोंग्यावर देखील बंदी आणायला हवी म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची सकाळ शुभ होईल, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.