31 C
Mumbai
Monday, February 10, 2025
घरविशेषउद्धव ठाकरेची अवस्था शोलेमधील असरानी सारखी !

उद्धव ठाकरेची अवस्था शोलेमधील असरानी सारखी !

भाजपा मंत्री आशिष शेलार यांची टीका

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे यांची अवस्था शोले मधील असरानी सारखी होणार असून म्हणूनच आपण एकटे लढणार असे सांगत आहेत. आधुनिक महाराष्ट्रातील दगाबाज नेते म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख आहे, असा हल्लाबोल माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेतील भाषणाचा आपल्या एक्स पोस्टवरुन समाचार घेताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, उध्दव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० चा आहे. त्यामुळे १९५१ साली स्थापन झालेल्या जन संघाच्या विषयी त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही. ५ आणि ६ एप्रिल १९८० रोजी दिल्लीत जन संघांच्या नेत्यांची बैठक होऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला त्यावेळी उध्दव ठाकरे यांचे वय २० वर्षे होते. त्यामुळे याबाबत त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही.

फोटोग्राफी करण्यात दंग असलेल्या आणि “करगोट्यातून इज्जत निसट्याच्या वयात” असतानाच्या काळातील संदर्भ देऊन बोलणाऱ्या उध्दव ठाकरे यांना आमचे सांगणे आहे की, तुम्ही कुठे जन संघ आणि भाजपाच्या स्थापनेवर बोलता ? १०० वर्षे पुर्ण करणाऱ्या संघावर बोलता? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात देशाचा बहुमान उंचावला तसेच भाजपा जगात एक नंबरचा पक्ष ज्यांनी करुन दाखवला त्या अमितभाई शाह यांच्यावर बोलता ? समाजवाद्यांची पुस्तके वाचून महाराष्ट्र आणि जनसंघाचा इतिहास तुम्हाला कळणार नाही.

हे ही वाचा : 

शरद पवार महाराष्ट्राला हिशोब द्या! १० वर्षे केंद्रीय कृषी मंत्री असताना काय केलेत?

प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम संपन्न

वक्फ दुरुस्ती विधेयक बैठकीत घातला गोंधळ, विरोधी पक्षातील १० खासदार निलंबित

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आयएएस अधिकारी पूजा सिंघलना सोरेन सरकारने घेतले नोकरीत

श्रीमान उद्धव ठाकरे तुम्ही अमिताभाई शाह यांच्या पाठीवर वळ उठवणार आहात ? कसले? केव्हा ? आधी तुम्ही तुमचे वडिल म्हणजे अखंड हिदूंचे आशास्थान वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा २६ जुलैच्या पुरात अडकले होते. तेव्हा तुम्ही मिठी नदीच्या पुराला “पाठ दाखवून” पंचतारांकित हॉटेलमध्ये पळालात त्या दुर्दैवी घटनेचे वळ तुमच्या पाठीवर आणि आयुष्यावर खूप खोल आहेत, ते कधीतरी मातोश्रीच्या आरशा समोर उभे राहून पहा.

कंत्राटदारांकडून कटकमिशन खाऊन मुंबईचा जो बट्याबोळ केलात त्याचे व्रण दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावर आहेत त्याच्या सुरकुत्या तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतात का? हे पण आरशाला विचारुन पहा. मग कळेल जखमा खोल आहेत की तुमच्या मेंदूतच झोल आहे, अशा शब्दांत मंत्री आशिष शेलार यांनी पलटवार केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
228,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा