केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवार, २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार १० वर्षे केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी काय केले? असा तिखट सवाल अमित शाह यांनी शरद पवारांना उद्देशून उपस्थित केला.
“गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या करावरून वाद होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने हा प्रश्न सोडवला. शरद पवार १० वर्षे देशाचे कृषी मंत्री होते. त्यावेळी सहकार क्षेत्र कृषी मंत्रालयांतर्गत होते. तेव्हा तुम्ही सहकार क्षेत्रासाठी काय केले? साखर कारखान्यांसाठी काय केले? याचा हिशोब महाराष्ट्राला तुम्ही द्यायला हवा. मार्केटिंग नेता बनून फिरणं सोपं आहे, जमिनीवर राहून काम करणे गरजेचं असतं,” असा सणसणीत टोला अमित शाह यांनी शरद पवारांना लगावला.
“गेल्या अनेक वर्षांपासून देशभरातील सहकार क्षेत्रातील लोक, सहकार मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करायचे, त्यांचे कोणीही ऐकत नव्हते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. इथे आत्मनिर्भरतेची सर्वात सुंदर कुठली व्याख्या असेल तर ती सहकार आहे,” असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांना सुनावले.
अमित शाह पुढे म्हणाले की, “लाल बहादुर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला, तर नरेंद्र मोदी यांनी ‘जय विज्ञान’चा नारा दिला. सहकार आणि विज्ञान याची जोड दिली तर शेती फायदेशीर ठरते. नरेंद्र मोदींनी माती परीक्षणाला सुरवात केली तेव्हा मातीत कोणती पिके घ्यावी आणि कोणती घेऊ नयेत हे शेतकऱ्यांना समजलं. पाण्यात पीएच मात्रा किती, सल्फर टाकायचे की नाही, कोणतं पीक घ्यावे याची माहिती मिळते,” असं अमित शाह म्हणाले.
हे ही वाचा..
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम संपन्न
विरोधी पक्षातील १० खासदारांचे निलंबन
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आयएएस अधिकारी पूजा सिंघलना सोरेन सरकारने घेतले नोकरीत
घुसखोरांना आसरा देणाऱ्यांना आसरा मिळणार नाही!
ऑर्गेनिक कॉर्पोरेट स्थापन करून शेती माल विक्री करून जो पैसा येणार तो शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. ऑर्गेनिक प्रमाणपत्र असणारे उत्पादन तयार करा असं आवाहन यावेळी अमित शाहांनी शेतकऱ्यांनी केलं. जवान आणि किसान हे दोघेच ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता भारत माताची सेवा करतात असंही ते म्हणाले.