देशासह राज्यातही अनेक घुसखोर बांगलादेशी-रोहिंगे वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे, येत आहे. अशा घुसखोरांना शोधून काढण्यासाठी पोलीस दल विशेष मोहीम राबवत आहेत, त्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. भारतात वास्तव्य करण्यासाठी घुसखोर बांगलादेशी-रोहिंग्यानी बनावट कागदपत्रांचा वापर करून आधारकार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखले काढले आहेत आणि यामध्ये ग्राम पंचायती, तहसील कार्यालयामधील लोकांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे.
काही पैशांसाठी सरकारी कार्यालयातील लोक अशा घुसखोरांना मदत करताना दिसत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर नाशिकमधील तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे व नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यावर नुकतीच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, घुसखोर प्रकरणावर भाजपा महिला आमदार चित्रा वाघ यांचे वक्तव्य समोर आले. घुसखोरांना आसरा देणाऱ्यांना आसरा मिळणार नाही, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, घुसखोरांना आसरा देणाऱ्यांना आसरा मिळणार नाही. तुम्हाला आठवत असेलच, निवडणुकीपूर्वी देवाभाऊंनी बांगलादेशी रोहिंग्यांना आव्हान दिलं होतं. ते म्हणाले होते की महाराष्ट्रात एकाही घुसखोराला राहू देणार नाही. जाती-आधारित आणि सांप्रदायिक विभाजन निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अराजकतावादी शक्तींचा सामना करण्यासाठी आमचे सरकार कटीबध्द आहे. आमच्या देवाभाऊंची खासियत आहे ते दिलेला शब्द खरा करतात.
हे ही वाचा :
महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी-रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रांसाठी केले अर्ज!
महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी-रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रांसाठी केले अर्ज!
भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीत भीषण स्फोट; पाच जणांचा मृत्यू
प्रजासत्ताक दिनी पाकिस्तासह बांगलादेश सीमेवरही हाय अलर्ट!
त्या पुढे म्हणाल्या, झालं असं की मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना सुरू आहे हे कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. जिहाद विरोधातल्या या लढाईत देवाभाऊंच्या साथीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी डिपार्टमेंटमधल्या देशद्रोह्यांना शोधायला मदत केली आणि बांगलादेशी रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र वाटणाऱ्या देशद्रोही असलेल्या अधिकाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला.
याप्रकरणात दोषी असलेल्या तहसीलदार नितीन देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धरणाकर यांचं निलंबन करण्यात आले. याआधीही सांगितले होते आत्ताही सांगते, देशद्रोह्यांनो आमच्या देवाभाऊंपासून सावध रहा. कारण इथे कायद्यात रहाल तरच फायद्यात रहाल नाहीतर बाराच्या भावात आत जाल, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
घुसखोरांना आसरा देणाऱ्यांना आसरा मिळणार नाही…
तुम्हाला आठवत असेलच… निवडणुकीपूर्वी देवाभाऊंनी बांगलादेशी रोहिंग्यांना आव्हान दिलं होतं…ते म्हणाले होते की महाराष्ट्रात एकाही घुसखोराला राहू देणार नाही जाती-आधारित आणि सांप्रदायिक विभाजन निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या… pic.twitter.com/IAOSjoKWaA
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 24, 2025