बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मोठा दावा केला आहे. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात एक हजाराहून अधिक बांगलादेशी नागरिकांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज केले आहेत. महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी-रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रांसाठी अर्ज केल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. भिवंडी तहसीलदार कार्यालयाला भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे, यावर्षी जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसीलदारला मिळाले आहेत. पण गेल्या दोन चार वर्षात काही ग्राम पंचायती अशा आहेत, ज्यामध्ये खोणी महापोली आणि पडघा-बोरीवली आहेत. अशा ग्राम पंचायतीमधून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या जन्म दाखले दिले जात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः अशा प्रकरणात लक्ष घातले आहे.
हे ही वाचा :
पतंजली फूड्सला लाल मिरची पावडरची बॅच मागे घेण्याचे आदेश
भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीत भीषण स्फोट; पाच जणांचा मृत्यू
प्रजासत्ताक दिनी पाकिस्तासह बांगलादेश सीमेवरही हाय अलर्ट!
मणिपूरमधून प्रतिबंधित कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीच्या सक्रीय सदस्यांना अटक
याठिकाणी इथे कोणताही नवीन दाखला, जोपर्यंत मंत्रालायातून स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत दिला जाणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. ५०-६० वर्षीय लोक अर्ज करत आहेत, तर एवढ्या वर्षे हे होते कुठे आणि सर्व घेतलेले पुरावे बनावट आहेत. म्हणून ज्यांना दाखले देणार आहेत, ज्यांना देण्याची तयारी आहे, अशा सर्वांची चौकशी होणार. अशा घोटाळ्यांमध्ये समावेश असणाऱ्या अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले.