मणिपूरमध्ये हिंसाचार शमला असला तरी सुरक्षा दल आणि पोलिसांची कारवाई अद्याप सुरू आहे. कारवाई दरम्यान सुरक्षा दलांनी मणिपूरच्या काही जिल्ह्यांमधून प्रतिबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली असून ‘पीटीआय’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. शिवाय या कार्यकर्त्यांच्या ताब्यातून काही शस्त्रे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
माहितीनुसार, सुरक्षा दलांनी मणिपूरच्या थौबल आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये कारवाई केली. या जिल्ह्यांमध्ये केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत प्रतिबंधित संघटनांच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रावरी दिली. प्रतिबंधित कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीच्या (PWG) दोन सक्रिय सदस्यांना थौबलमधील उनिंगखाँग येथून गुरुवारी अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या ताब्यातून पिस्तूल, दारूगोळा, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
यापूर्वी दोन दिवसांआधी मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. टोप खोंगनांगखोंग येथून बंदी घातलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) एका सक्रिय सदस्याला अटक करण्यात आली. येंगखोम भोगेन सिंग (वय ५० वर्षे) असे त्याचे नाव आहे. तर, बंदी घातलेल्या कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीच्या (एमएफएल) एका सदस्याला मंत्रीपुखरी बाजार येथून अटक करण्यात आली आहे. पुखरामबम थोइबा सिंग (वय ३८ वर्षे) असे त्याचे नाव आहे.
हे ही वाचा:
ट्रम्प यांच्या जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या निर्णयावर स्थगिती
दिल्लीत वेचून वेचून काढणार बांगलादेशी!
यावेळेला सूड उगवायचा आहे, सूड, सूड…
शिवसेनेचा, बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा विचार हाच आमचा गॉडफादर!
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेची माफी मागितली होती. त्यांनी मणिपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल खेद व्यक्त केला. तसेच आगामी वर्षात संपूर्ण राज्यात स्थिती पूर्ववत होईल अशी आशा व्यक्त केली.