बांगलादेशी रोहिंग्यांच्या घुसखोरीचा मुद्दा सध्या देशभरात ऐरणीवर आला असून संपूर्ण देशात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीत निवडणुकीचे वारे वाहत असून घुसखोरांवर कारवाई करण्याचे सत्र देखील सुरू आहे. बनावट कागदपत्रांच्या मदतीने घुसखोरांनी मतदान करू नये यासाठी अधिक कठोरपणे कारवाई केली जात आहे.
घुसखोरीच्या चालू तपासाचा एक भाग म्हणून दिल्ली पोलिसांनी बुधवारी दिल्लीतील झोपडपट्टी भागात शोध मोहीम राबवली. एएनआयशी बोलताना पश्चिम दिल्लीचे डीसीपी विचित्रा वीर म्हणाले की, कुटुंबातील सदस्य सहसा कामानंतर घरीच राहत असल्याने व्यक्तींची सहज तपासणी सुनिश्चित करण्यासाठी रात्री शोधमोहिम घेण्यात आली. रात्री ही मोहीम राबविण्याचा उद्देश हा आहे की लोक दिवसा कामावर जातात. रात्री कुटुंबातील सर्व सदस्य घरी भेटतात, त्यामुळे पडताळणी करणे सोपे होते. सध्या आम्ही पश्चिम दिल्लीतून १० बांगलादेशींना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये देखील प्रक्रिया पार पाडत आहे.
हे ही वाचा:
यावेळेला सूड उगवायचा आहे, सूड, सूड…
शिवसेनेचा, बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा विचार हाच आमचा गॉडफादर!
आरोपीला हस्तक्षेप याचिका करण्याचा अधिकार नाही…
‘राष्ट्रग्रंथ : आधारस्तंभ लोकशाहीचा’ प्रयोगाचा शुभारंभ २६ जानेवारीला
रोहिंग्या आणि बांगलादेशी स्थलांतरितांची मते मिळविण्यासाठी मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड पुरवल्याचा आरोप भाजपाकडून दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारवर केला जात आहे. सोमवारी, दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनीही गुन्हेगारी कारवायांमध्ये अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांच्या वाढत्या सहभागावर चिंता व्यक्त केली. त्यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटवून त्यांना पकडण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.