भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षपूर्तीदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रग्रंथ आधारस्तंभ लोकशाहीचा’ या प्रयोगाचा शुभारंभ होत आहे. २६ जानेवारी रोजी माटुंग्याच्या यशवंत नाट्यंमदिरात हा प्रयोग होत आहे. आर्टिस्टिक ह्युमन्स निर्मित, नवनीत प्रकाशित तसेच दर्शन महाराज यांची संकल्पना या प्रयोगामागे आहे.
या नाट्यकृतीचे लेखन प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर यांनी केले आहे.
हे ही वाचा:
उलथापालथीचे पुरोगामी स्वप्न पुन्हा भंगले
अरविंद केजरीवाल यमुनेत स्नान करणार का?
छोटा राजनचा हस्तक डी.के.रावला खंडणीच्या गुन्ह्यात अटक!
या नाटकाचे दिग्दर्शक कुमार सोहोनी असून संगीत मिलिंद जोशी यांचे आहे. सूत्रधार नितीन नाईक आहेत. वेशभूषा चैत्राली डोंगरे यांची आहे तर समन्वय डॉ. सुमेध चव्हाण.