हरियाणातील रेवाडी येथून पोलिस आणि गुप्तचर विभागाने १७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. हे सर्वजण १५ वर्षांहून अधिक काळ भारतात बेकायदेशीरपणे राहत होते. अटक केलेल्यांमध्ये ७ पुरुष, ५ महिला आणि ५ मुले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे एका वीटभट्टीवर छापा टाकला असता त्यावेळी त्यांच्याकडे कोणतेही भारतीय कागदपत्र नव्हते. यानंतर हरियाणा पोलिसांची कारवाई करत १७ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. दरम्यान, गुप्तचर विभाग या भागात बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांची ओळख पटविण्यासाठी एक विशेष मोहीम राबवत आहे.
अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांनी मोठा खुलासा केला. चौकशी दरम्यान, त्यांनी सांगितले की, सुरुवातीला ते काही वर्षे राजस्थानमध्ये राहिले आणि त्यानंतर रेवाडीला आले. इथे आल्यानंतर, ते सहारनवास गावातील एका वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करू लागले. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध बेकायदेशीर प्रवेशाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा :
‘राष्ट्रग्रंथ : आधारस्तंभ लोकशाहीचा’ प्रयोगाचा शुभारंभ २६ जानेवारीला
अरविंद केजरीवाल यमुनेत स्नान करणार का?
उलथापालथीचे पुरोगामी स्वप्न पुन्हा भंगले
उत्तराखंडने समान नागरी संहिता अधिसूचित केली
दरम्यान, भारतात बेकादेशीररित्या शिरकाव करणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार विशेष मोहीम राबवत अशा घुसखोरांना पकडण्याचे काम करत आहे. आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली असून शोध मोहीम सुरूच आहे. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिक हे बरीच वर्षे भारतात वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे, एका भारतीय नागरिकाला एका आधारकार्ड शिवाय दुसरे आधारकार्ड मिळत नाही. मात्र, अटक करण्यात आलेल्या अनेक बांगलादेशींकडे तब्बल १५ हून अधिक आधाराकार्ड सापडले आहेत. यावरून यांच्या ओळखीचा अंदाज लावू शकतो.