मणिपूरमधून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) पक्षाने बुधवार, २२ जानेवारी रोजी मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला. मणिपूरमध्ये सध्या मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेत आहे. जेडीयूने पाठींबा काढून घेतल्यामुळे सरकार धोक्यात आल्याचे बोलले जात असताना आकडेवारीनुसार मात्र, मणिपूर सरकारला कोणताही धोका नसणार आहे. मात्र, पाठिंबा काढून घेण्यात आल्यानंतर नितीश कुमारांच्या पक्षाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. जेडीयूने पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत मणिपूरमधील प्रदेशाध्यक्षांची हकालपट्टी केली आहे.
मणिपूरमध्ये जेडीयूचे सहा आमदार निवडून आले होते. मात्र, या सहा पैकी पाच आमदारांनी यापूर्वीचं भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यात जे एक आमदार जेडीयूमध्ये होते, त्यांनी भाजपला दिलेला आपला पाठिंबा मागे घेतला आहे. त्यामुळे जरी मणिपूरमध्ये जेडीयूने भाजपचा पाठिंबा काढला असला तरी सरकारला कुठलाही धोका नाही, सरकार स्थिर आहे. मात्र, जेडीयूच्या या निर्णयामुळे मणिपूरमधील भाजप सरकारला मोठा धक्का बसेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता जेडीयूने पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत मणिपूरमधील प्रदेशाध्यक्षांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे नितीश कुमार भाजपची साथ सोडणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
उलथापालथीचे पुरोगामी स्वप्न पुन्हा भंगले…
मणिपूरमध्ये भाजप नेते बिरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पाठिंबा जेडीयूने काढून घेतला. मात्र मणिपूर जेडीयूने पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मणिपूरमधील… pic.twitter.com/yOEjhQsg2Q
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 23, 2025
हे ही वाचा :
पुण्यात बांगलादेशीकडे सापडले १५ आधार कार्ड, ८ पॅन कार्ड, ८ जन्मदाखले!
दिशा सालीयन प्रकरणी आदित्य ठाकरे अडचणीत, न्यायालयाने सुनावले
पुणे: अवैध मस्जिद-मदरशावर फडणवीस सरकारचा बुलडोझर!
यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधकांना सुनावले आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, “उलथापालथीचे पुरोगामी स्वप्न पुन्हा भंगले. मणिपूरमध्ये भाजप नेते बिरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पाठिंबा जेडीयूने काढून घेतला. मात्र मणिपूर जेडीयूने पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मणिपूरमधील प्रदेशाध्यक्षांची हकालपट्टी केली आहे. यामुळे मणिपूरसारखाच केंद्र सरकारचा देखील पाठिंबा नितीश कुमार काढून घेतील यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या विघ्न संतोषी विरोधकांना सणसणीत चपराक बसली आहे. धन्यवाद नितीश कुमार,” अशी टीका भातखळकर यांनी विरोधकांवर केली आहे.