पुण्यातील स्वारगेट परिसरातून बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे १५ आधार कार्ड, ८ पॅन कार्ड सापडले आहेत. एहसान हाफिज शेख असे अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. एहसान शेख हा २००४ पासून पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट परिसरातील महर्षीनगरमधून बांगलादेशी घुसखोराला अटक करण्यात आली. बांगलादेशी घुसखोराकडे बनावट कागदपत्रांचा ठीग सापडला. त्याच्याकडून ८ पॅनकार्ड, १५ आधारकार्ड, २ मतदान कार्ड, २ ड्रायव्हिंग लायसन्स, ३ पासपोर्ट, ९ डेबिट कार्ड, ८ क्रेडिट कार्ड जप्त केले आहेत. शेखकडून ३ शाळा सोडल्याचे दाखले, ८ जन्म दाखले हे देखील जप्त केले आहेत.
हे ही वाचा :
दिशा सालीयन प्रकरणी आदित्य ठाकरे अडचणीत, न्यायालयाने सुनावले
पुणे: अवैध मस्जिद-मदरशावर फडणवीस सरकारचा बुलडोझर!
छोटा राजनचा हस्तक डी.के.रावला खंडणीच्या गुन्ह्यात अटक!
पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवैत, कतार, यूएई आणि मलेशिया या देशांच्या चलनी नोटा सुद्धा केल्या जप्त केल्या आहे. पतित पावन संघटना, क्रांतिवीर सेना, सकल हिंदू समाज आदी विविध संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शेख याला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. शेख याने बांगलादेशींना कागदपत्रे तयार करुन मदत केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.