दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आली असून सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (२३ जानेवारी) किरारी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बजरंग शुक्ला यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री योगींनी प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभाचा उल्लेख करत आम आदमी पार्टी सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
यमुनेच्या मुद्द्यावरून दिल्ली सरकारला कोंडीत पकडताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, काल प्रयागराजच्या संगमात माझ्यासोबत ५४ मंत्र्यांनी स्नान केल्याचे तुम्ही पाहिले असेल. मुख्यमंत्री या नात्याने मी आणि माझे मंत्री जर संगमात स्नान करू शकतो तर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना माझा सवाल आहे कि ते त्यांच्या मंत्र्यांसोबत यमुना नदीत स्नान करू शकतात का?. ते पुढे म्हणाले, यांनी यमुनेचे नाल्यात रुपांतर केले आहे. तर प्रयागराजमध्ये गंगा सतत वाहत असते, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले.
हे ही वाचा :
उलथापालथीचे पुरोगामी स्वप्न पुन्हा भंगले
उत्तराखंडने समान नागरी संहिता अधिसूचित केली
पुण्यात बांगलादेशीकडे सापडले १५ आधार कार्ड, ८ पॅन कार्ड, ८ जन्मदाखले!
दिशा सालीयन प्रकरणी आदित्य ठाकरे अडचणीत, न्यायालयाने सुनावले
दिल्लीच्या रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत? त्यांना कोणतेही विकासाचे काम करायचे नाही. लोकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून हे काम करणार नाहीत. भल्या पहाटे सोशल मीडियावर ट्विट करणे एवढेच त्यांचे काम आहे. पत्रकार परिषद घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.