योगगुरू रामदेव बाबा यांची कंपनी पतंजली फूड्स अडचणीत सापडली असून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मोठी कारवाई केली आहे. पतंजली फूड्स लिमिटेडला लाल मिरची पावडरची एक बॅच परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहे आहेत. अन्न सुरक्षा नियमांचे पालन न केल्याचे कारण देत कंपनीने हे निर्देश कंपनीला दिले आहेत.
बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली फूड्सला FSSAI ने लाल मिरची पावडर मागे घेण्याचे आदेश गुरुवारी दिले आहेत. लाल मिरची पावडरची विशिष्ट तुकडी अन्न नियामक FSSAI च्या मानकांची पूर्तता करत नाही त्यामुळे ते मागे घेण्यास सांगितले आहे. हा बॅच क्रमांक AJD2400012 आहे. हे FSSAI (Contaminants, Toxins and Residues) नियमावली २०११ च्या नियमांचे पालन करत नाही. पतंजली फूड्सला लाल मिरची पावडरची ही बॅच बाजारातून पूर्णपणे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीनेच आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.
पतंजली फूड्स ही बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद समूहाची कंपनी असून त्याची स्थापना १९८६ मध्ये झाली होती. ही भारतातील आघाडीच्या FMCG कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी खाद्यतेल, अन्न आणि FMCG आणि पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात आहे. पतंजली रुची गोल्ड, न्यूट्रेला इत्यादी विविध ब्रँड अंतर्गत उत्पादने विकते.
हे ही वाचा:
मणिपूरमधून प्रतिबंधित कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीच्या सक्रीय सदस्यांना अटक
ट्रम्प यांच्या जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या निर्णयावर स्थगिती
दिल्लीत वेचून वेचून काढणार बांगलादेशी!
यावेळेला सूड उगवायचा आहे, सूड, सूड…
अलीकडेच केंद्रीय भूजल प्राधिकरणाने पतंजली फूड्स लिमिटेडला काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. केंद्रीय भूजल प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी केंद्रीय भूजल नियमांनुसार पूर्वीच्या एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) पुनर्भरण नियमांची पूर्तता न केल्याच्या प्रकरणात कारवाई केली होती.