गुजरातमधील अहमदाबादमध्ये गोराक्षकावर हल्ला करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एका गोरक्षकाने काही दिवसांपूर्वी गोमांस तस्करी करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर गोरक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तक्रार केल्यामुळेच त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची शक्यता आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात मोहम्मद हुसेनसह पाच जणांना अटक केली आहे.
माहितीनुसार, करंज पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या लाल दरवाजा परिसरात गोरक्षकांवर हा हल्ला झाला. गोरक्षक मनोज बारिया यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बारिया यांनी माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी ८ वाजता तो मित्रासोबत उभे असताना मास्क घातलेल्या चार ते पाच जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्रे आणि काठ्यांनी हल्ला केला. दरम्यान, पीडित गोरक्षकाने हल्लेखोरामधील एकाच्या आवाजावरून त्याला ओळखले. हल्लेखोर मोहम्मद हुसेन उर्फ लाईट उस्मान गांची होता.
हे ही वाचा..
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम संपन्न
विरोधी पक्षातील १० खासदारांचे निलंबन
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आयएएस अधिकारी पूजा सिंघलना सोरेन सरकारने घेतले नोकरीत
घुसखोरांना आसरा देणाऱ्यांना आसरा मिळणार नाही!
जवळपास तीन महिन्यांपूर्वी मनोज बारिया यांनी गांधीनगरमध्ये हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध ७०० किलो गोमांसाची तस्करी करत असल्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या घटनेचा बदला घेण्यासाठी हुसेन आणि त्याच्या साथीदारांनी गोरक्षक मनोज बारियावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मोहम्मद वसीम कुरेशी, मुबीन खान पठाण आणि इतर दोघे सामील होते. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ११८(१) आणि गुजरात पोलिस कायद्याच्या कलम १३५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.