बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनण्याचे ठरवले आहे. आजच सायंकाळी महाकुंभाच्या संगमावर ती पिंडदान करणार आहे. सायंकाळीच तिचा पट्टाभिषेक सुद्धा होणार आहे. ममता कुलकर्णीच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे.
ममता कुलकर्णी हिने यापूर्वीच किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी, जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अंबानंद गिरी यांच्याबरोबर या निर्णयाच्या अनुषंगाने बातचीत केली आहे. या संदर्भातील काही छायाचित्र समाज मध्यमामध्ये प्रसिद्ध झाली आहेत.
हेही वाचा..
२६/११ चा दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणणार
हमासच्या कैदेत असलेल्या चार महिला सैनिकांची सुटका होणार!
अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा करणाऱ्या विष्णू गुप्ता यांच्या गाडीवर गोळीबार
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येताचं भारत योग्य पावले उचलेल!
तब्बल २५ वर्षानंतर ममता भारतात परत आल्यानंतर चर्चा सुरु झाल्या होत्या. गत वर्षी डिसेंबरमध्ये मुंबई विमानतळावर तिचे आगमन झाले होते. इतक्या वर्षांनी तिचे भारतात आगमन झाल्यामुळे बॉलीवूडमध्ये चर्चांना उधाण आले होते. दरम्यान तिचे येणे हे बिग बोसमध्ये भाग घेण्यासाठीचे असल्याचे बोलले गेले होते. या सगळ्या चर्चा एका बाजूला सुरु असताना आता तिचे नवा धक्कादायक निर्णय समोर आला आहे. आता ति महामंडलेश्वर होणार आहे.