बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. तर, एक आरोपी अद्याप फरार असून त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. यानंतर संतोष देशमुख हत्येप्रकरणी शनिवार, २५ जानेवारी रोजी मुंबईत जनआक्रोश मोर्चाला काढण्यात आला आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चासाठी मुंबईसह राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात लोक आले आहेत. अठरापगड जातीचे लोक या मोर्चासाठी येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. परभणी, बीड, धाराशिव, पैठण, छत्रपती संभाजीनगर, वाशिमनंतर मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या मोर्चात सहभागी झाले आहे.
हे ही वाचा :
अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांच्या हद्दपार मोहिमेला सुरुवात
२६/११ चा दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणणार
हमासच्या कैदेत असलेल्या चार महिला सैनिकांची सुटका होणार!
अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा करणाऱ्या विष्णू गुप्ता यांच्या गाडीवर गोळीबार
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्या आणि आरोपींना फाशी द्या, अशी विनंती करण्यात येत आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, हीच प्रमुख मागणी असल्याचे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले. जे सराईत आरोपी आहेत. सराईत गुन्हेगार आहेत. या सर्वांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. आमचे अनेक मोर्चे निघाले. आमचे एकच आव्हान आहे की शांततेत मोर्चे पार पडले पाहिजे आपल्या न्यायच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे. यामध्ये कोणी असेल त्याला कठोरात कठोर फाशीची शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले आहेत. शेवटचा आरोपी संपेपर्यंत आम्ही थांबणार नाही. त्यांना फाशी शिक्षा दिली जावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.