आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने टी- २० पुरुषांच्या संघाची घोषणा केली आहे. या संघात चार भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. टी- २० विश्वचषक विजेता कर्णधार आणि भारतीय फलंदाज रोहित शर्मा याला २०२४ साठी आयसीसी टी- २० पुरूष संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. तसेच हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनाही या संघात स्थान देण्यात आले आहे.
आयसीसीने शनिवार, २५ जानेवारी रोजी या संघाची घोषणा केली. तब्बल चार भारतीय खेळाडूंना या संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे. तर, पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम देखील या संघाचा भाग आहे. विशेष म्हणजे या संघात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या संघात आपले स्थान निश्चित करू शकला नाही. जूनमध्ये झालेल्या टी- २० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजयी खेळी करूनही विराट कोहलीला या निवडलेल्या संघात स्थान मिळालेले नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही गेल्या वर्षी बार्बाडोसमध्ये भारताला विश्वविजेतेपद पटकावून दिल्यानंतर टी- २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अर्शदीप आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश संघात आहे. तर, राशिद खान आणि वानिंदू हसरंगा हे दोन फिरकीपटू संघात आहेत तर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा हा एकमेव अष्टपैलू खेळाडू आहे. या संघात ऑस्ट्रेलियन खेळाडू ट्रॅव्हिस हेड, इंग्लंडचा फलंदाज फिल सॉल्ट यांचाही समावेश आहे. यानंतर बाबर आझम, वेस्ट इंडीजचा निकोलस पूरन संघात आहे. पूरन हा यष्टीरक्षक म्हणून संघात आहे.
हे ही वाचा :
‘आप’च्या बेईमान लोकांच्या यादीत राहुल गांधींचा फोटो!
रिलायन्स भारतात उभारणार जगातील डेटा सेंटर्सच्या तुलनेत तिप्पट क्षमता असलेले सेंटर!
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांच्या हद्दपार मोहिमेला सुरुवात
आयसीसी टी- २० २०२४ वर्षाचा पुरुष संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, फिल सॉल्ट, बाबर आझम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सिकंदर रझा, हार्दिक पांड्या, रशीद खान, वानिंदू हसरंगा, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.