लेखक, दिग्दर्शक जयेश मेस्त्री यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘जादूचा दिवा’ या बाल नाट्याला बालरसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यासोबतचं या नाटकाला पुरस्कार रुपी कौतुकाची थाप देखील मिळत आहे. आतापर्यंत यंदाच्या वर्षी या नाटकाने तीन परितोषिके मिळवली आहेत.
मनोहर हरिराम चोगले विद्यालयाच्या ‘जादूचा दिवा’ बालनाट्याला स्पर्धांमध्ये जबरदस्त यश मिळाले आहे. मुलांच्या भावविश्वाला स्पर्श करून हसत खेळत संदेश देणारे असे हे ‘जादूचा दिवा’ बालनाट्य आहे. महाराष्ट्र शासन आयोजित राज्य बाल नाट्य स्पर्धेत जयोस्तु जयेश मेस्त्री या बाल कलाकाराने अभिनय गुणवत्ता श्रेणीत प्रथम पारितोषिक पटकावले आहे. याशिवाय जेईएस करंडकच्या प्राथमिक फेरीत जयोस्तु मेस्त्री याला लक्षवेधी अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले. तर, जेईएस करंडकच्या अंतिम फेरत जयोस्तु मेस्त्री या बाल कलाकाराला उत्कृष्ट अभिनेता श्रेणीत द्वितीय पारितोषिक मिळाले.
हे ही वाचा :
आयसीसी टी- २० पुरुष संघाची घोषणा; रोहित शर्माकडे धुरा
‘आप’च्या बेईमान लोकांच्या यादीत राहुल गांधींचा फोटो!
रिलायन्स भारतात उभारणार जगातील डेटा सेंटर्सच्या तुलनेत तिप्पट क्षमता असलेले सेंटर!
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
या बालनाट्यात साईनाथ कांबळे, वृंदा शेळके, सोहिरा शिवरकर, शुभांगी जाधव, मंजुश्री चव्हाण, प्रांजल खोंडे, मनस्वी जाधव, यश्वी खोंडे, अर्पित राठोड, सिया अंधारे, विधी उतेकर, वैष्णव डेरे, हर्षिता गायकर, अर्णव तळेकर आणि जयोस्तु मेस्त्री यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर राजन वर्दम यांनी रंगभूषा केली असून प्रकाशयोजना उन्मेष वीरकर यांनी पाहिली आहे. वेशभूषा आणि सहाय्यक दिग्दर्शक अशी जबाबदारी रेशमा मेस्त्री यांनी पार पाडली आहे. तंत्रज्ञ रोहित राठोड तर, नेपथ्य प्रवीण सोनावणे यांनी केले आहे. संगीत आणि नृत्य वैष्णवी सकपाळ यांनी पाहिले आहे.