यंदाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ‘रक्षा कवच’ या थीमसह प्रदर्शन सादर करणार आहे. यामुळे भारताची लष्करी ताकद जगाला दिसणार आहे. DRDO ने भारताचे घातक लेझर शस्त्र दुर्गा-२ आणि कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा (पृष्ठभागावरून मारा) या प्रदर्शनामध्ये समावेश केला आहे.
DRDO च्या विशेष प्रयोगशाळा CHESS (उच्च ऊर्जा प्रणाली आणि विज्ञान केंद्र) ने अनेक वर्षांपासून संशोधन आणि अभ्यास करून दुर्गा- २ विकसित केले आहे. दुर्गा- २ च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, समोरून येणारे शत्रूचे हवाई हल्ले किफायतशीर खर्चात हाणून पाडण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. दुर्गा- २ 25Kw पॉवर लेझरने सुसज्ज आहे, जे पाच किमी अंतरावर येणारे लक्ष्य गाठू शकते. समोरून येणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा नाश करण्यासाठी याचा उपयोग आहे. DRDO च्या मते, दुर्गा- २ ने समोरून येणारे कोणतेही क्षेपणास्त्र केवळ ३.५ डॉलर्समध्ये (३०० ते ३५० भारतीय रुपये) मध्ये नष्ट केले जाऊ शकते.
हवाई संरक्षण प्रणालीवरील खर्चाचा अंदाज यावरूनच लावता येतो की, इराणला इस्रायलवर हल्ला करण्यासाठी एक लाख डॉलर खर्च करावे लागले, तर जगातील सर्वात यशस्वी हवाई संरक्षण प्रणाली मानल्या जाणाऱ्या आयर्न- डोमचा वापर करावा लागणं हे इराणने केलेल्या खर्चाच्या पाच पट आहे. अमेरिकेबाबत विचार केला तर त्यांना एक क्षेपणास्त्र नष्ट करण्यासाठी १६ कोटी रुपये खर्च करावे लागतात.
दुर्गा- २ प्रमाणेच अमेरिकेने HELIOS देखील बनवले आहे, ज्यात 60Kw क्षमतेचा लेझर बीम वापरला आहे. सर्वात प्रगत लेझर बीम सध्या ब्रिटनमध्ये ड्रॅगनफायर आहे, ज्याचा वापर करण्यासाठी सुमारे १३ डॉलर खर्च येतो. ड्रॅगनफायरच्या क्षमतेबद्दल विचार करायचा झाल्यास हे बीम एक किमी अंतरावर ठेवलेल्या नाण्यालाही अचूकपणे छेदू शकते.
हे ही वाचा :
जयेश मेस्त्री लिखित, दिग्दर्शित ‘जादूचा दिवा’ बालनाट्याला घवघवीत यश
आयसीसी टी- २० पुरुष संघाची घोषणा; रोहित शर्माकडे धुरा
‘आप’च्या बेईमान लोकांच्या यादीत राहुल गांधींचा फोटो!
रिलायन्स भारतात उभारणार जगातील डेटा सेंटर्सच्या तुलनेत तिप्पट क्षमता असलेले सेंटर!
DRDO या प्रदर्शनामध्ये आणखी दहा विशेष सुरक्षा प्रणालींचे प्रदर्शन करणार आहे. सर्वांच्या नजरा प्रलय आणि दुर्गा- २ वर असल्या तरी इतर सुरक्षा प्रणालीही महत्त्वाच्या आहेत.
- क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाइल
- एअरबोर्न, अर्ली वॉर्निंग आणि कंट्रोल सिस्टम.
- ड्रोन, डिटेक्ट, डिटर आणि डिस्ट्रॉय सिस्टम.
- उपग्रह-आधारित पाळत ठेवणे प्रणाली.
- मध्यम पॉवर रडार ‘अरुधा’
- इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली ‘धारशक्ती’
- प्रगत हलके टॉर्पेडो.
- अतिशय शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम.
- स्वदेशी मानवरहित हवाई यंत्रणा.