अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोट भस्मसात!

१८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले

अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोट भस्मसात!

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजेदरम्यान बोटीला आग लागली. आगीची घटना घडली तेव्हा बोटीमध्ये १८ ते २० खलाशी होते. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाच्या मदतीने बोटीवरील सर्व प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात आले. आगीचे कारण अद्याप कारण समोर नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग कशामुळे लागली याची तपासणी सुरु आहे.

कोस्ट गार्ड आणि स्थानिकांच्या मदतीने बोटीला समुद्राच्या कडेला आणत आग विझवण्यात आली. साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट असल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. समुद्राच्या मध्यभागी बोटीला आगीने वेढा घातल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. आगीच्या ज्वाळा आणि धुरांचे लोट दिसून येत आहेत.

हे ही वाचा : 

बांगलादेशात शेख मुजीबुर रहमान, इंदिरा गांधी; हसीना शेख यांच्या खुणा पुसण्यास सुरुवात

५०० अधिकारी, ड्रोनचा वापर, डॉग स्क्वॉड, स्थानिकांची मदत…अखेर आरोपी दत्तात्रय गाडेला अटक!

उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; ४७ कामगार अडकले

महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कुंभमेळ्यात जगभरातील कोट्यवधींनी केले स्नान

दरम्यान, या आधीही अलिबागच्या मांडवा बंदरात एका खाजगी स्पीड बोटीला २ डिसेंबर २०२३ ला आग लागली होती. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले होते. बोटीमधील जनरेटरमुळे आग लागल्याचे समोर आले होते. या अपघातात बोटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

Exit mobile version