उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये पार पडलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये जगभरातून करोडो भाविक सहभागी झाले होते. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी झाले नव्हते. यावरून या दोन्ही नेत्यांवर टीका केली जात असताना आता राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.
आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, “अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यवधी श्रध्दाळू दर्शन करुन आले. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ सिनेमा आला महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी लोकांनी तो पाहिला. ‘छावा’वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी आणि त्यांचा ‘सामना’ सोडून जगभरातील लिहिणारे, बोलणारे बोलत आहेत, स्वागत करीत आहेत. कुंभमेळा भरला महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी भाविक सहभागी होऊन पवित्र स्नान करुन आले. सभेत दाखवण्यापूर्ती हातात रुद्राक्षाची माळ घाली औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी. ओळखलेत का? महाराष्ट्रातील ते हिंदुत्ववादी ढोंगी?” असा सवल करत त्यांनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे.
◆अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यवधी श्रध्दाळू दर्शन करुन आले.
◆आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील "छावा" सिनेमा आला
महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी लोकांनी तो पाहिला… !◆"छावा" वर…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 28, 2025
हे ही वाचा :
सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले तुहिन कांत पांडे कोण आहेत?
पाणी पिण्यासाठी आला आणि… ७२ तासांनंतर दत्तात्रय गाडेच्या आवळल्या मुसस्क्या
सद्गुरूंना काँग्रेसचे डी. के. शिवकुमार भेटले, काँग्रेसचा झाला तीळपापड
यापूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही खासदार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर महाकुंभमधील अनुपस्थितीमुळे हल्लाबोल केला होता. रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी महाकुंभाला उपस्थित न राहून हिंदुत्वाचा अपमान केला आहे. हिंदू मतदारांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर बहिष्कार टाकला पाहिजे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी महाकुंभात सहभागी व्हायला हवे होते. त्यांना नेहमीच हिंदू मते हवी असतात, तरीही त्यांनी महाकुंभात भाग घेतला नाही. हिंदू मतदारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकावा.