27 C
Mumbai
Tuesday, March 25, 2025
घरविशेषदिल्लीतील १४ रुग्णालयांमध्ये आयसीयू नाहीत, १२ रूग्णालये रुग्णवाहिकेविना, मोहल्ला क्लिनिकमध्ये शौचालये नाहीत

दिल्लीतील १४ रुग्णालयांमध्ये आयसीयू नाहीत, १२ रूग्णालये रुग्णवाहिकेविना, मोहल्ला क्लिनिकमध्ये शौचालये नाहीत

कॅग अहवालातून दिल्लीतील आरोग्य सेवांबाबत धक्कादायक खुलासे

Google News Follow

Related

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपचे सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडले असून दिल्लीच्या आरोग्य सेवांबाबत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. माहितीनुसार, कॅगच्या अहवालात गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत दिल्लीच्या सार्वजनिक आरोग्य सेवा व्यवस्थेतील गंभीर गैरव्यवस्थापन, आर्थिक निष्काळजीपणा आणि जबाबदारीचा अभाव उघडकीस आला आहे.

कॅगच्या अहवालात म्हटले आहे की, दिल्लीतील १४ रुग्णालयांमध्ये आयसीयू नाहीत, तर १२ रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत, मोहल्ला क्लिनिकमध्ये शौचालयाची सुविधा नाही. तर, अहवालानुसार, कोविड- १९ चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळालेल्या ७८७.९१ कोटी रुपयांपैकी फक्त ५८२.८४ कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर उर्वरित रक्कम अखर्चित राहिली आहे. यामुळे कोरोना संकटाच्या काळात अत्यावश्यक सुविधांची मोठी कमतरता होती. दिल्ली विधानसभेत हा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये गंभीर सेवांचा अभाव असल्याचे अहवालातून समोर आले आहे. शहरातील २७ रुग्णालयांपैकी १४ रुग्णालयांमध्ये आयसीयू सुविधा नाहीत, तर १६ रुग्णालयांमध्ये रक्तपेढ्या नाहीत. याव्यतिरिक्त, आठ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आणि १५ रुग्णालयांमध्ये शवगृह नाही. धक्कादायक बाब म्हणजे १२ रुग्णालये रुग्णवाहिका सेवेशिवाय कार्यरत आहेत.

अनेक मोहल्ला क्लिनिकमध्ये शौचालये, वीज बॅकअप आणि तपासणी टेबल यासारख्या आवश्यक सुविधांचाही अभाव आहे. आयुष दवाखान्यांमध्येही अशाच प्रकारच्या कमतरता आढळून आल्या आहेत. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. ज्यामध्ये २१ टक्के परिचारिकांची कमतरता, ३८ टक्के पॅरामेडिक्सची कमतरता आणि काही रुग्णालयांमध्ये ५०-९६ टक्के डॉक्टर आणि परिचारिकांची कमतरता आहे. राजीव गांधी आणि जनकपुरी सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये ऑपरेशन थिएटर, आयसीयू बेड आणि खाजगी खोल्या वापरात नाहीत, तर ट्रॉमा सेंटरमध्ये आपत्कालीन काळजीसाठी तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे.

कोविड-१९ प्रतिसादासाठी देण्यात आलेल्या ७८७.९१ कोटी रुपयांपैकी केवळ ५८२.८४ कोटी रुपयेच वापरले गेले. आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी ठेवण्यात आलेले एकूण ३०.५२ कोटी रुपये खर्च न झालेले राहिले, तर आवश्यक औषधे आणि पीपीई किटसाठी देण्यात आलेले ८३.१४ कोटी रुपये वापरात नव्हते. ३२,००० नवीन रुग्णालयातील बेडपैकी केवळ १,३५७ (४.२४ टक्के) जोडण्यात आले. काही रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या १०१ टक्के ते १८९ टक्के इतकी असल्याचे दिसून आले, ज्यामुळे रुग्णांना जमिनीवर झोपावे लागले.

हे ही वाचा : 

सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले तुहिन कांत पांडे कोण आहेत?

पाणी पिण्यासाठी आला आणि… ७२ तासांनंतर दत्तात्रय गाडेच्या आवळल्या मुसस्क्या

सद्गुरूंना काँग्रेसचे डी. के. शिवकुमार भेटले, काँग्रेसचा झाला तीळपापड

महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत बजरंग दलाकडून ‘लव्ह जिहाद’ थीमवर चित्ररथ

प्रमुख रुग्णालयांच्या प्रकल्पांना ३-६ वर्षांचा विलंब झाला, ज्यामध्ये खर्चात ३८२.५२ कोटी रुपये वाढ झाली. यामुळे इंदिरा गांधी रुग्णालय, बुरारी रुग्णालय आणि एमए डेंटल पीएचडी-II सारख्या रुग्णालयांवर लक्षणीय परिणाम झाला. लोक नायक रुग्णालयातील रुग्णांना सामान्य शस्त्रक्रियांसाठी २-३ महिने आणि बर्न, प्लास्टिक शस्त्रक्रियांसाठी ६-८ महिने वाट पाहावी लागते. सीएनबीसी रुग्णालयामध्ये बालरोग शस्त्रक्रियांसाठी १२ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी असतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा