पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे बलात्कार झाल्याची घटना घडली होती. यामुळे खळबळ उडाली असून दोन दिवस आरोपीचा शोध घेतला जात होता. अखेर दत्तात्रय गाडे याच्या मुसक्या पोलिसांनी गुणाट गावातून आवळल्या आहेत. या आरोपीचा शोध घेण्यासाठी तब्बल १३ पथके, डॉग स्क्वाड आणि ड्रोन्स यांची मदत घेतली जात होती. अखेर ७२ तासानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्राय गाडेला शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून पकडण्यात आले. दत्तात्रय गाडे हा गुणाट गावातील एका नातेवाईकाच्या घरी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पाणी पिण्यास आला होता. मला पश्चाताप झाला असून पोलिसांसमोर सरेंडर व्हायच असल्याच सांगून हा नातेवाईकांच्या घरातून निघून गेला. यानंतर त्या नातेवाईकांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली आणि पोलिसांनी गाडे याला काही वेळातच अटक केली.
पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी १०० पोलिसांचा ताफा, डॉग स्कॉड गावात नेले होते. दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांनी १३ पथकं तयार केली होती. तसेच आरोपीचा तांत्रिकदृष्ट्या विश्लेषणाद्वारे देखील शोध घेतला जात होता. तर आरोपीने मागील दिवसात ज्या ज्या व्यक्तींना फोन केले होते त्या सर्व व्यक्तींकडे पोलिसांमार्फत चौकशी केली जात होती. तर, आरोपी दत्तात्रय गाडे याला शोधून देणार्या नागरिकाला पुणे पोलिसांनी एक लाख रूपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते.
हे ही वाचा :
सद्गुरूंना काँग्रेसचे डी. के. शिवकुमार भेटले, काँग्रेसचा झाला तीळपापड
महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत बजरंग दलाकडून ‘लव्ह जिहाद’ थीमवर चित्ररथ
मुंबईत कसा सुरू आहे ‘हाऊसिंग जिहाद’?
उबाठाच्या संजय राऊतांविरोधात शिवसेना महिला आघाडीने उगारले ‘जोडे’
अटक केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याला लष्कर पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.