अजमेर जिल्हा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरुद्ध सातवी मोठी कारवाई केली आहे, ज्यामध्ये आतापर्यंत एकूण १७ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहेत. बेकायदेशीर बांगलादेशी आणि इतर घुसखोरांना ओळखून त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
एसएचओ दिनेश कुमार जीवनानी म्हणाले की, ही विशेष मोहीम अजमेर जिल्हा पोलिस अधीक्षक वंदिता राणा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिमांशू जगिंद आणि मंडळ अधिकारी लक्ष्मण राम यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. दर्गा परिसरातील विविध संभाव्य भागात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी पथकाने सखोल मोहीम राबवली.
ते पुढे म्हणाले, खबऱ्यांकडून आणि तांत्रिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना पकडण्यासाठी दर्गा परिसर, जालियन कब्रस्तान, अंदकोट, न्यू रोड आणि इतर भागात शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान, १५-२० संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यापैकी एक, मोहम्मद आरिफ हुसेन, जो दरिरामपूर, जिल्हा मयमनसिंग, बांगलादेश येथील रहिवासी आहे, त्याला अटक करण्यात आली. मोहम्मद आरिफने बांगलादेशी नागरिक असल्याचे काबुल केले. सुमारे १० वर्षांपूर्वी बांगलादेशातील बेनापोल सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश त्याने चौकशीत सांगितले.
हे ही वाचा :
सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले तुहिन कांत पांडे कोण आहेत?
पाणी पिण्यासाठी आला आणि… ७२ तासांनंतर दत्तात्रय गाडेच्या आवळल्या मुसस्क्या
वसंत मोरेंनी स्वारगेटमध्ये दाखवली पत्रकारितेची लक्तरे
चौकशीदरम्यान मोहम्मद आरिफ हुसेनने सांगितले की, कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात आला होता आणि येथे बेकायदेशीरपणे राहत होता. वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यानंतर तो दर्ग्या परिसरात आला, असे पोलिसांनी सांगितले. पुढील कारवाईसाठी त्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.