27 C
Mumbai
Tuesday, March 25, 2025
घरविशेष५०० अधिकारी, ड्रोनचा वापर, डॉग स्क्वॉड, स्थानिकांची मदत...अखेर आरोपी दत्तात्रय गाडेला अटक!

५०० अधिकारी, ड्रोनचा वापर, डॉग स्क्वॉड, स्थानिकांची मदत…अखेर आरोपी दत्तात्रय गाडेला अटक!

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितला घटनाक्रम

Google News Follow

Related

पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. घटना घडल्यानंतर आरोपी फरार होता. पुणे पोलिसांची विशेष पथके आरोपीच्या शोधात होती. अखेर मध्यरात्री आरोपी दत्तात्रय गाडे याला गुनाट गावातून पथकाने अटक केली. आरोपीच्या अटकेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत आरोपीच्या अटकेचा घटनाक्रम सांगितला.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, घटना घडल्यानंतर आरोपीच्या अटकेसाठी तीन दिवसापासून ऑपरेशन सुरु होते. स्वारगेट पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच अंदाजे ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ऑपरेशनमध्ये होते. आज अखेर त्याला गुनाट गावातून पथकाने ताब्यात घेतले.

आरोपीच्या शोधासाठी ४०० ते ५०० स्थानिकांचे सहकार्य मिळाले. आमचे डॉग स्क्वॉड वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. उसाचे शेत श्वानानेच दाखवले. ड्रोनचा वापर करत संपूर्ण परिसराची पाहणी सुरूच होती. आरोपीच्या शोधासाठी सर्व प्रयत्न सुरु होते. अखेर या प्रयत्नानंतर मध्यरात्री १ वाजून १० मिनिटाने आरोपीला ताब्यात घेतले.

ते पुढे म्हणाले, आरोपीला अटक केल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तपासासाठी एक विशेष पथक तयार केले असून पुरावे तयार केले जात आहेत. स्पेशल कौन्सिलची नियुक्ती होणार आहे. फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवणार असून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे.

महिलांच्या सुरक्षेच्या विषयी एक आढावा घेण्यात आला. निर्जनस्थळी, एसटी स्टँड , रेल्वे स्थानक, डार्क स्पॉट, टेकडी स्पॉट, हॉटस्पॉटचे सेफ्टी ऑडिट सुरू आहे. महापालिका आणि संबंधित विभागासोबत मिळून डार्क स्पॉट ठिकाणी दिवे लावण्याची, दिव्यांची संख्या वाढवण्याची उपाययोजना सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

अजमेर: स्पेशल टास्क फोर्सकडून बांगलादेशीला अटक, आतापर्यंत १७ जणांना अटक!

महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कुंभमेळ्यात जगभरातील कोट्यवधींनी केले स्नान

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, चौघांना अटक!

दिल्लीतील १४ रुग्णालयांमध्ये आयसीयू नाहीत, १२ रूग्णालये रुग्णवाहिकेविना, मोहल्ला क्लिनिकमध्ये शौचालये नाहीत

पोलीस आयुक्त कुमार म्हणाले, आरोपीला अटक करण्यात नक्कीच उशीर झाला, तीन दिवस लागले. पहिल्या दिवशी फिर्याद आल्यावर दीड ते दोन तासात वेगवेगळ्या टीम कामाला लागल्या. यामध्ये अंदाजे २३ सीसीटीव्ही कॅमेरे एसटी स्टँडच्या आतील भागातील आणि बाहेरील ४८ कॅमेरे तपासले. दीड-दोन तासांच्या आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आले. यानंतर आमध्ये पथक गुनाट गावात दोनच्या सुमारास पोहोचेल होते. मात्र, त्यावेळी आरोपी सापडला नाही. अखेर काल सापडला. गावातील नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

सुरवातीला पोलीस पथकाकडून शोधमोहीम सुरु होती. मात्र, पोलीस आपल्या मागावर असल्याचे आरोपीला समजताच आम्ही गावातील सरपंच, नागरिकांना माहिती देत त्यांना एकत्रित करत शोधमोहीम सुरु केली. याच दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस देखील पुणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आले होते. यावर पोलीस आयुक्त कुमार म्हणाले, आरोपी पाणी पिण्यासाठी एका कडे आला आणि नंतर तो पळाला, त्यानंतर त्यांनी आम्हाला फोन करून आरोपीची माहिती दिली.

या माहितीनंतर ड्रोनच्या सहाय्याने आरोपीची दिशा दिसून आली आणि आरोपीला अटक केली. यामध्ये शेवटची माहिती ज्यांनी दिली, ज्यामुळे आरोपी पकडला गेला, त्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच गावासाठी काही करता येईल का याचाही विचार केला जात असल्याचे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, आरोपीवर मोबाईल चोरी सारखे पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर हद्दीत सहा गुन्हे दाखल आहेत. ते पुढे म्हणाले, आरोपीची प्राथमिक आरोग्य तपासणी झाली आहे आणि त्याच्या गळ्यावर मार्क आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. दोरी तुटल्यामुळे आणि लोकांनी घटनास्थळी जाऊन त्याला वाचवल्यामुळे ते होवू शकले नाही, असे बोलले जात आहे. या तपासासाठी आमचे एक पथक घटनास्थळी जाऊन तपास करणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
238,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा