28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषक्रिकेट खेळताना तरुण मैदानावरच कोसळला!

क्रिकेट खेळताना तरुण मैदानावरच कोसळला!

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Google News Follow

Related

मीरारोडमध्ये क्रिकेट खेळत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मीरारोडच्या काशिमीरा परिसरातील एका टर्फमध्ये बॉक्स क्रिकेट खेळत असताना एक तरुण अचानक खाली कोसळला अन त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या घटनेचा संपूर्ण प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून काशिगाव पोलीस या घटनेचा तपास करत आहेत .

मिळालेल्या माहितीनुसार, एका कंपनीकडून क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये कंपनीतील तरुण एकमेकांच्या विरोधात क्रिकेट खेळत होते.त्यामध्ये एक तरुण जोरदार चेंडू मारताना दिसत आहे.तरुणाने चेंडू मारल्यानंतर काही सेकंदातच तो खाली कोसळतो.तरुण खाली कोसळल्यानंतर त्याचे मित्र पुढे सरसावत त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.मात्र या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.काशीगाव पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.दरम्यान, तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

कोल्हापुरात भरधाव कारने सहा जणांना उडवले! तिघे मृत

शैक्षणिक नैराश्यातून मुंबईतील ‘आयएएस’ दाम्पत्याच्या मुलीने केली आत्महत्या

आंतरवाली सराटीतील गावकरीच जरांगेच्या विरोधात!

सलामीच्याच सामन्यात वेस्ट इंडिजची दमछाक!

 

दरम्यान, पुण्यामध्ये एक नुकतीच घटना घडली होती.ज्यामध्ये एका ११ वर्षीय मुलाला चेंडूचा मारा लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना प्रायव्हेट पार्टला चेंडू लागल्याने एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.शौर्य असे मुलाचे नाव होते.आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळात असताना फलंदाजाने मारलेला चेंडू थेट शौर्यच्या प्रायव्हेट पार्टला लागल्याने तो खाली कोसळला.त्यानंतर शौर्यला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले आले.परंतु डॉक्टरांनी तपासणी करून शौर्यला मृत घोषित केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा