28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषकोल्हापुरात भरधाव कारने सहा जणांना उडवले! तिघे मृत

कोल्हापुरात भरधाव कारने सहा जणांना उडवले! तिघे मृत

व्हीडिओ व्हायरल

Google News Follow

Related

पुण्यातील अपघात प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूरमध्येही असाच एक अपघात झाला आहे. कोल्हापूरमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका गाडीने सहा जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरमधील सायबर चौकात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोल्हापुरातील सायबर चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. राजारामपुरी, शिवाजी विद्यापीठ आणि राजाराम कॉलेजला जोडणाऱ्या चौकात दिवसा गर्दी असते. तसेच या चौकाच्या बाजूला अनेक शाळा आणि सायबर कॉलेजही आहेत. राजारामपुरीकडून आलेल्या एका भरधाव कारने अनेकांना धडक दिली. गाडीची धडक बसताच वाटेत असलेले लोक हवेत उडाल्याचे दिसून आले. टू व्हीलरवरील लोकही दोन-तीन जण हवेत उडाल्याचं दिसून आलं. ही कारसुद्धा पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला आदळली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कोल्हापुरातील या घटनेमध्ये दोघांचा जागेवरच जीव गेला असून इतर तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

एग्झिट पोलनंतर आता मतमोजणीवर लक्ष

मालदीवने दाखवली पॅलेस्टाइनप्रति एकजूटता

उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषद भोवणार, कारवाईचे आदेश

राममंदिराच्या पुजाऱ्याने पंतप्रधान मोदींबाबत सांगितले मोठे भविष्य!

कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चारही दुचाकींसह कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या सहाही जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा