31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेषहिमाचलमधील भूस्खलनाला बेबंद बांधकामे कारणीभूत

हिमाचलमधील भूस्खलनाला बेबंद बांधकामे कारणीभूत

हिमाचलमध्ये पायथ्याशी असलेले खडक कापल्यामुळे आणि पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे भूस्खलनात वाढ

Google News Follow

Related

हिमाचल प्रदेशात निसर्गाचा प्रकोप अजून शमलेला नाही. रविवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे भूस्खलन होऊन अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. आतापर्यंत राज्यात पावसाने ७४ बळी घेतले आहेत. आता या नैसर्गिक संकटाचे कारण पुढे आले आहे. नाजूक आणि संवेदनशील भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या हिमालयात बेबंद वाढत गेलेली बांधकामे, घटते वन क्षेत्र आणि नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी बांधकामे या भूस्खलनाला कारणीभूत मानली जात आहेत.

हिमाचल प्रदेशात आता विविध विकासकामे केली जात आहेत. तेथे रस्तेनिर्मिती आणि रस्ते रुंद करण्यासाठी डोंगर खोदले जात आहेत. तसेच, जलविद्युत प्रकल्पांसाठी डोंगरावर स्फोट घडवले जात आहेत. ही कारणेही या भूस्खलनाला कारणीभूत ठरत आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते हिमाचलमध्ये पायथ्याशी असलेले खडक कापल्यामुळे आणि पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे भूस्खलनात वाढ होत आहे.

हिमाचल प्रदेशात जून ते सप्टेंबर या संपूर्ण मान्सून हंगामात सरासरी ७३० मिमी पाऊस पडतो. मात्र हवामान विभागानुसार, या वर्षी आतापर्यंत राज्यात ७४२ मिमी पाऊस पडला आहे. राज्याच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचलमध्ये मान्सूनची सुरुवात झाल्यापासून ५५ दिवसांत भूस्खलनाच्या ११५ घटना घडल्या आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन हजार ४९१ कोटी तर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुमारे एक हजार कोटींचे नुकसान आतापर्यंत झाले आहे. तर, संपूर्ण राज्याचे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी भारतात नव्हे अफगाणिस्तानात; नऊ पत्रकारांना अटक

कोव्हिड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरला अटक

नो आयडी नो एंट्री, दारूवर बंदी; जाधवपूर विद्यापीठाची नवीन नियमावली !

कोट्यवधीच्या ड्रग्ससह अकरा जणांना अटक

हिमाचल प्रदेशमध्ये अजूनही बचावकार्य जोरात सुरू आहे. हवाई दलाच्या मदतीने जवान येथे लोकांची सुटका करत आहेत. आतापर्यंत तीन हजार जणांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशात दोन महिन्यांत नैसर्गिक संकटामुळे तब्बल ३०० जणांचा मृत्यू झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा