27 C
Mumbai
Thursday, January 8, 2026
घरविशेषरणजितसिंह मोहिते पाटलांवर होणार कारवाई?, भाजपाने शिस्तभंगाची पाठीविली नोटीस

रणजितसिंह मोहिते पाटलांवर होणार कारवाई?, भाजपाने शिस्तभंगाची पाठीविली नोटीस

सात दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आवाहन 

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटलांवर पक्षाकडून कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात पक्षाकडे तक्रार केली होती. यावर आता पक्षाने दखल घेत मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे दिसत आहे.

पक्षाचे जबाबदार प्रतिनिधी असूनही पक्षशिस्त भंग करणारे कृत्य वारंवार निदर्शनास आल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. मोहिते पाटील यांना आठ मुद्यांवर शिंस्तभंग केल्यासंदर्भात विचारणा केली आहे. यावर येत्या सात दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिल्यानंतर मोहिते पाटील भाजपापासून दूर झाल्याची बातमी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेलाही गैरहजर असल्याचे दिसून आले होते.

विशेष म्हणजे, लोकसभेच्या निवडणुकीनंतर अकलूज येथे मविआच्या खासदारांच्या सत्कार समारंभाला मोहिते पाटील यांनी हजेरी लागली होती. तसेच सोलापूरच्या विकासासाठी आपण काहीही तडजोड करायला तयार असल्याचे विधान त्यांनी त्यावेळी केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात तक्रारी सुरु झाल्या.

हे ही वाचा : 

‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाच्या बाजूने २६९ तर विरोधात १९८ मते!

‘योगी की कुर्बानी दे दूंगा’ अशी धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, पिस्तुलही सापडली!

उत्तर प्रदेशातील तरुण इस्रायलला जातायत तर, काँग्रेस ‘पॅलेस्टाईन’ची बॅग घेऊन फिरतेय!

उद्धव ठाकरे भेटले फडणवीसांना; अभिनंदनासाठी की विरोधी पक्षनेतेपदासाठी?

विधानसभेसाठी माळशिरसमधून उभा राहिलेल्या भाजपच्या राम सातपुते यांच्या सभेलाही मोहिते पाटील यांनी दांडी मारली होती. निवडणुकीत पराभव होताच राम सातपुतेंच्या विरोधात मोहिते पाटलांनी भूमिका घेतली होती. यानंतर मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यांनी अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली होती. यानंतर पक्षाकडून मोहिते पाटलांना शिस्तभंगाची नोटीस पाठविली आहे. त्यामुळे पुढे मोहिते पाटलांवर पक्ष कारवाई करेल का?, अशी चर्चा होत आहे.

दरम्यान, मोहिते पाटलांना पक्षाने शिस्तभंगाची नोटीस पाठवल्यानंतर राम सातपुते यांनी भाजपाचे आभार मानले आहेत. राम सातपुते यांनी ट्वीटकरत म्हटले, भारतीय जनता पार्टीशी विश्वासघात करणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईचा बडगा उचल्याबद्दल भाजपाचे धन्यवाद. भारतीय जनता पार्टीच्या माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांना केलेली मारहाण, दिलेल्या धमक्या याची दखल पक्षाने घेतल्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते पक्ष श्रेष्ठींचे आभारी आहोत. पक्षाशी गद्दारी व कृतघ्नता याला माफी नाहीच, असे राम सातपुते म्हणाले आहेत.  +

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा