25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
घरविशेषअभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे हिचे कर्करोगाने निधन

अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे हिचे कर्करोगाने निधन

वयाच्या ३२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. तिच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचे निधन झाल्याची माहिती समोर आली असून पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याबाबतची पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली. पूनम पांडेला सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कर्करोग होता, असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिच्या टीमकडून इंस्टावर पोस्ट करण्यात आलेल्या माहितीनंतर खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

युक्रेनने बुडवली रशियाची युद्धनौका

अमेरिकेकडून भारताला मिळणार ३१ एमक्यू- ९ बी सशस्त्र ड्रोन्स

मालदिवला दिल्या जाणाऱ्या निधीत कपात; अन्य देशांच्या मदतीतही घट

या पोस्टवर पूनमच्या चाहत्यांनी कॉमेंट करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे. २०१३ मध्ये पूनमने ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या या निधनामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीलाच धक्का बसला आहे. पूनम तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असायची. नुकतीच पूनमने कंगनाच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये हजेरी लावली होती, परंतु ती या शोमध्ये जिंकू शकली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
130,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा