29 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
घरविशेषअदानी उद्योगाच्या समभागांचे एका दिवसात एक लाख कोटीचे नुकसान!

अदानी उद्योगाच्या समभागांचे एका दिवसात एक लाख कोटीचे नुकसान!

ग्रीन एनर्जी कंपनीचे सर्वाधिक नुकसान

Google News Follow

Related

सेबीच्या अध्यक्षांनी स्मॉलकॅप आणि मिडकॅप गटातील कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याबदद्ल चिंता व्यक्त केल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. या दोन्ही गटांतील कंपन्यांच्या समभागांची गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यामुळे बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९०६.०७ अंकांनी कोसळत ७२ हजार ७६९.८९वर स्थिरावला. बाजारातील या ‘ब्लडबाथ’मुळे अदानी ग्रुपच्या समभागांचेही दिवसभरात तब्बल १.१ लाख कोटीचे नुकसान झाले. अमेरिकेतील हिंडनबर्गने अदानी ग्रुपविरोधात दिलेल्या वृत्तानंतर अदानी समभागांचे अखेरचे इतके मोठे नुकसान २ फेब्रुवारी, २०२३ रोजी झाले होते.

बुधवारी, शेअर बाजार बंद झाल्यावर अदानी ग्रुपच्या ११ कंपन्यांचे सरासरी बाजार भांडवल १५.८ लाख कोटींवरून १४.७ लाख कोटींवर घसरले. अदानी ग्रुपचे समभागही गडगडले होते. सर्वाधिक नुकसान झाले ते अदानी टोटल गएस कंपनीचे. या कंपनीचे समभाग ९.५ टक्क्यांनी घसरले. अदानी ग्रुपचे समभाग घसरण्याचे विशेष कारण देण्यात आले नाही. सर्वसाधारणपणे पूर्ण शेअर बाजारच गडगडल्याने ही परिस्थिती उद्भवली.

हे ही वाचा:

मनोहर लाल खट्टर पंजाबचे राज्यपाल होण्याची शक्यता!

मविआला ‘गडकरी प्रेम’ सिद्ध करण्याची संधी

१४ महिन्यांच्या वनवासानंतर रिषभ पंत उतरणार मैदानात

मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा!

अदानी ग्रुप कंपनीमध्ये सर्वाधिक नुकसान अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे झाले. या कंपनीचे समभाग ९.१ टक्क्यांनी घसरले. त्यामुळे बाजार भांडवलाचे सुमारे २७ हजार ३०० कोटींचे नुकसान झाले. त्यामागोमाग अदानी एंटरप्रायझेसचे बाजार भांडवल २४ हजार ६०० कोटींनी कमी झाले. त्यातील सर्वाधिक कमी नुकसान संघी एंटरप्रायझेसचे नोंदले गेले. मंगळवारी बाजार बंद झाला, तेव्हा या कंपनीचे बाजार भांडवल दोन हजार ८१५ कोटी होते. मात्र दिवसभरात कंपनीचे २५७ कोटींचे नुकसान झाले. जानेवारी २०२३मध्ये हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी ग्रुपचे १० समभाग घसरले होते. ही घसरगुंडी तब्बल पाच आठवडे सुरू होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
146,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा