25 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरविशेषठाकरेंना अदानींचं खाजगी विमान चालतं, एरव्ही अदानी खटकतात!

ठाकरेंना अदानींचं खाजगी विमान चालतं, एरव्ही अदानी खटकतात!

भाजपा आमदार नितेश राणेंची टीका

Google News Follow

Related

उद्धव ठाकरेंना अदानींचं खासगी विमान चालतं, एरव्ही अदानी खटकतात, अशा शब्दांत भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना जाब विचारला आहे. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी गौतम अदानीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप केला होता. यावर नितेश राणे यांनी प्रत्युतर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले, गौतम अदानींचा पैसा कोठेही जाऊ शकतो. देशासह राज्यात ज्या पद्धतीने राजकारण सुरु आहे, तिथे मोदी-शहांचा पैसा म्हणजेच गौतम अदानींचा पैसा. यांचा पैसा सांभाळण्याचे काम अदानी करत आहेत. या पैशावर देशाचे राजकारण साडवले जातंय, नासवलं जातंय, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : 

मालेगाव व्होट जिहाद फंडिंग प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद संबंधी ईडीकडून छापेमारी

एनआयएकडून गैर-स्थानिकांच्या हत्येमधील दहशतवाद्याची मालमत्ता जप्त

बांगलादेशी-रोहिंग्यांचा बाजारात प्रवेश, भाजी विक्रेत्यांना गाड्यांवर नावे लिहावे लागणार!

‘व्होट जिहाद’चा पर्दाफार्श: मालेगावच्या बँकेत १२५ कोटींचे व्यवहार; दोघांच्या आवळल्या मुसक्या

संजय राऊतांच्या आरोपावर नितेश राणे म्हणाले, गौतम अदानींच्या माध्यमातून देशामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतोय. गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला, महाराष्ट्राला विरोध असे आहे. पण त्याच अदानींचे खाजगी विमान घेवून उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब सगळीकडे फिरतात हे सर्व चालत तेव्हा गौतम अदानी खटकत नाहीत. गौतम अदानींसोबत बसून ढोकळा आणि चटणी खायची आणि इतर वेळी त्यांच्यावर टीका करायची, असे नितेश राणे म्हणाले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा