29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषश्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे घरात असतानाच विकृत आफताबने आणली नवी मैत्रीण

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे घरात असतानाच विकृत आफताबने आणली नवी मैत्रीण

बाजारातून आणले सल्फर हायपोक्लोरिक अॅसिड

Google News Follow

Related

वसईतील श्रद्धा वालकर या तरूणीच्या हत्याकांडाचे रोज नवनवीन पैलू समोर येत आहेत. मानवतेला लाज आणेल अशी निर्घृण हत्या आफताब अमीन पूनावाला या युवकाने केली. हत्या केल्यानंतर आफताबने श्रद्धा वालकर हिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि त्याची विल्हेवाट लावली.

पण यानंतर त्याने जे केलं, ते त्याहीपेक्षा भयंकर होतं. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब डेटिंग साइटवर नव्या शिकारीच्या शोधात सक्रिय झाला. त्याची एका मुलीशी मैत्री झाली. श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे अजूनही घरात होते. तरीही आफताबने आपल्या नवीन मैत्रिणीला आपल्या घरी बोलावले. दिवसभर तो तिच्यासोबतच होत्या. त्या रात्री दोघांनी एकमेकांसोबत लैंगिक संबंधही ठेवल्याचं समोर आलंय. त्याला ना आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप होता, ना कायद्याची भीती हे यातून सिद्ध होते.

हत्याकांड झाल्यानंतर सहा महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताबला ताब्यात घेतले. आरोपी आफताबच्या कबुलीनंतर पोलीस आता पुरावे शोधत आहेत. आफताबने मृतदेहाचा तुकडे कुठे लपवले त्या ठिकाणी त्याला घेऊन जात आहेत.

दरम्यान, पोलिसांनी श्रद्धा आणि आफताबच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब फक्त इंग्रजीत YES I KILL HER म्हणत श्रद्धाच्या हत्येची कबुली देत आहे.

छातीवर बसून गळा दाबला

१८ मे रोजी श्रद्धा आणि आफताबमध्ये लग्न करण्यावरून कडाक्याचे भांडण झाले. भांडणाच्या वेळी तो श्रद्धाच्या छातीवर बसला आणि तिचा गळा दाबून खून केला. तिची हत्या केल्यानंतर त्याने आधी श्रद्धाचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इंटरनेटवर सर्च केले.

दुसऱ्या दिवशी त्याने इलेक्ट्रिक करवत आणली आणि मृतदेहाचे अनेक तुकडे केले. श्रद्धाचे आणि त्याचे रक्ताने माखलेले कपडे कचरा गाडीत टाकून दिले. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे कपाट, स्वयंपाकघर आणि फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर,पुरावे पुसण्यासाठी त्याने इंटरनेटवर शोध घेतला.

बाजारातून आणले सल्फर हायपोक्लोरिक ऍसिड

फॉरेन्सिक तपासणीत डीएनए नमुने सापडू नयेत म्हणून त्याने सल्फर हायपोक्लोरिक ऍसिडने फरशी धुतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने शेफचे प्रशिक्षण घेतले होते. हत्येनंतर पुढचे दोन दिवस तो मृतदेहाचे तुकडे करत होता. त्यांने पुढील तीन महिने तुकड्याची विल्हेवाट लावण्याबरोबरच श्रद्धाचे सोशल मीडिया अकाउंट्सही अपडेट ठेवले. जेणेकरून कोणालाही शंका येणार नाही. कारण श्रद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असायची.

आफताबने ९ जूनपर्यंत सोशल मीडियावर तिच्या मित्रांसोबत चॅटिंग करत सोशल मीडियावर श्रद्धाची भूमिका मांडली. या पद्धतींनी त्याने ६ महिने पोलिसांना चकवा दिला. अखेर पोलिसांनी त्याचा दरवाजा ठोठावला आणि पुराव्यांनिशी मुसक्या आवळल्या. तेव्हा त्याची सगळी हुशारी वाया गेली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा