28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषपिसेतल्या आगीनंतर मुंबईत ५ मार्चपर्यंत १५ टक्के पाणीकपात!

पिसेतल्या आगीनंतर मुंबईत ५ मार्चपर्यंत १५ टक्के पाणीकपात!

बीएमसीकडून जाहीर

Google News Follow

Related

पिसे येथील उदंचन केंद्रात सोमवारी संध्याकाळी लागलेल्या आगीचा फटका मुंबईतील नागरिकांना बसणार आहे.पिसे उदंचन केंद्रातील एक ट्रान्सफॉर्मर पूर्ण जळाल्यामुळे काही पंप बंद ठेवावे लागणारे आहेत.त्यामुळे बीएमसीने संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी व लगतच्या प्रदेशांमध्ये १५ टक्के पाणी कपात जाहीर केली आहे.हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होण्यास ५ मार्चपर्यंत वेळ लागणार आहे.५ मार्च पर्यंत पाणी कपात असणार असल्याचे बीएमसीकडून मंगळवारी (२७ फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले.

बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंपिंग स्टेशनमध्ये चार ट्रान्सफॉर्मर आहेत.चारपैकी एका ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम सुरु होते, त्यावेळे दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली.पंपिंग स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीमुळे जास्त नुकसान होऊ नये यासाठी आम्हाला इतर ट्रान्सफॉर्मर देखील बंद करावे लागले.सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमाराच लागलेली आग रात्री दहाच्या सुमारास विझवण्यात आली.आग विझवल्यानंतर परिसथितीचा आढावा घेऊन पालिकेच्या यंत्रणेने ताबडतोब दुरुस्तीकाम हाती घेतले.त्यानंतर २० पैकी १५ पंप सुरू करण्यात पालिकेच्या यंत्रणेला यश आले आहे.

हे ही वाचा:

भाईंदरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांचा भाजपात प्रवेश!

कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी कारागृहातील बॅरेक वाढवणार

सरकारला जेव्हा जाग येते…

आगीच्या दुर्घटनेमुळे १०० टक्के पाणी पुरवठा बंद राहील असा इशारा पालिकेकडून देण्यात आला होता.मात्र, सोमवारी बाराच्या सुमारास एक ट्रान्सफार्मर केल्यानंतर हळूहळू आठ पंप सुरु करण्याला यश आले.यानंतर मंगळवारी पहाटे चार वाजल्यापासून पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे आठ पंप सुरू करण्यात आले.सकाळी नऊ वाजल्यापासून पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील गोलंजी, रावळी, फॉसबेरी व भंडारवाडा सेवा जलाशयातून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आले.

त्यानंतर सकाळी ११ वाजता दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तो देखील सुरू करण्यात आला व त्यावर केंद्रातील इतर सहा पंप हळूहळू सुरू करण्यात आले.त्यानंतर मंगळवार सायंकाळपर्यंत सुमारे ७० टक्के पाणी पुरवठा करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, पिसे येथील चार ट्रान्सफार्मरपैकी एक ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाल्यामुळे याच्या दुरुस्तीसाठी ५ मार्चपर्यंत वेळ लागणार आहे.त्यामुळे बुधवार पासून संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणी कपात करावी लागणार आहे, असे माहिती जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा