29 C
Mumbai
Thursday, May 19, 2022
घरविशेष'द काश्मीर फाइल्स' नंतर आता येणार 'द दिल्ली फाइल्स'!

‘द काश्मीर फाइल्स’ नंतर आता येणार ‘द दिल्ली फाइल्स’!

Related

विवेके अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने चित्रपटगृहात धुमाकूळ घातला. या यशानंतर आता दिग्दर्शक विवेक यांनी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली असून, यामुळे चाहते खुश झाले आहेत. ‘द दिल्ली फाइल्स’ असे नवीन येणाऱ्या चित्रपटाचे नाव असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. आज १५ रोजी विवेक यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे.

दिग्दर्शक विवेक यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, ” मी सर्व लोकांचे आभार मानतो ज्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला प्रेम दिले. गेल्या चार वर्षांपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे हा चित्रपट बनवला आहे. मात्र आता वेळ आली आहे दुसऱ्या चित्रपटात काम करण्याची, काश्मिरी हिंदूंवर होत असलेल्या नरसंहार आणि अन्यायाबद्दल लोकांना जागरुक करणे हा माझा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आता नवीन चित्रपटाकडे लक्ष आहे. ”

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी ट्विटमध्ये चित्रपटाचे नाव घोषित केले आहे. द दिल्ली फाइल्स असे चित्रपटाचे आहे. या चित्रपटाचे नावावरून असे मानले जात आहे की, ही कथा दिल्लीतील गुन्ह्यावर आधारित असू शकते. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शकाने चित्रपटाची एक झलक शेअर केली होती, ज्याचे पोस्टर लाल-काळ्या रंगात दिसले होते. अद्याप या चित्रपटाबाबत कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नाही.

हे ही वाचा:

सोमय्यांनी आरोप केलेले प्रवीण कलमे म्हणाले …..

रामनवमीच्या गदारोळानंतर जेएनयूमध्ये फडकले भगवे झेंडे

‘देशातल्या मोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटायची’

शांघायमध्ये लॉकडाऊनमुळे होतेय लोकांची उपासमार

‘द काश्मीर फाइल्स’ ११ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले होते. २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने सुमारे २५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,973चाहतेआवड दर्शवा
1,889अनुयायीअनुकरण करा
9,340सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा