26 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरविशेषराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे नेतृत्व आकाश शिंदेकडे

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे नेतृत्व आकाश शिंदेकडे

ओदिशा येथे होणार स्पर्धा

Google News Follow

Related

ओडिसा येथे होणाऱ्या ७१व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आज आपला पुरुष संघ जाहीर केला. ओडिसा, कटक येथील जे. एन. बंदिस्त क्रीडा संकुल येथे दिनांक २० ते २३ फेब्रु. २०२५ या कालावधीत ही स्पर्धा खेळविण्यात येईल. नाशिकच्या आकाश शिंदेकडे पुन्हा एकदा या संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे.
गतवर्षी अहमदनगर, महाराष्ट्र येथे झालेल्या ७०व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत धडक देत तृतीय क्रमांक मिळविला होता. निवडण्यात आलेला हा संघ १९फेब्रुवारी रोजी पहाटे स्पर्धेकरिता कटक येथे रवाना होईल. अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ने एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमांना दिली.
हे ही वाचा:
निवडण्यात आलेला संघ –
पुरुष संघ:- १)आकाश शिंदे – संघनायक, २)आकाश रूडले, ३)शंकर गदई, ४)तेजस पाटील, ५)संकेत सावंत, ६)अक्षय सूर्यवंशी, ७)मयूर कदम, ८)शिवम पठारे, ९)प्रणय राणे, १०)अजित चौहान, ११) कृषिकेश भोजने, १२)संभाजी वाबळे.
प्रशिक्षक:- प्रताप शेट्टी.  व्यवस्थापक :- सचिन शिंदे.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा