36 C
Mumbai
Friday, March 13, 2026
घरविशेषकेदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह सर्व ७ जणांचा मृत्यू

केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह सर्व ७ जणांचा मृत्यू

Google News Follow

Related

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात रविवारी सकाळी केदारनाथधाम येथून गुप्तकाशीकडे निघालेलं एक हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झालं. या दुर्घटनेत २३ महिन्यांच्या एका बालकासह पायलट आणि इतर सहा तीर्थयात्रींचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टरने अवघ्या १० मिनिटांच्या छोट्या उड्डाणासाठी केदारनाथहून उड्डाण घेतलं होतं. मात्र, गौरीमाई खर्क परिसरातील घनदाट जंगलात सकाळी सुमारे ५:२० वाजता हे हेलिकॉप्टर गौरीकुंड व सोनप्रयाग यांच्यामधील भागात कोसळलं.

उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशन डेव्हलपमेंट अथॉरिटी (UCADA) च्या अधिकृत निवेदनानुसार, मृतांमध्ये ६ तीर्थयात्री आणि एक पायलट यांचा समावेश आहे. मृतांपैकी एक लहान बाळ आणि पाच प्रौढ होते. हे सर्व प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात येथील रहिवासी होते. अधिकार्यांच्या मते, या अपघातामागील संभाव्य कारणे म्हणजे अल्प दृश्यता आणि प्रतिकूल हवामान असू शकते.

हेही वाचा..

हेलिकॉप्टर अपघात : एसओपी लागू करण्याचे आदेश

रूपाणी यांचा डीएनए अद्याप जुळला नाही !

ब्रिटनमध्ये सात पाकिस्तानी दोषी; दोन मुलींचे लैंगिक शोषण

गोवंडीत डंपरच्या धडकेत एकाच कुटूंबातील चौघे ठार

एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या बचाव पथकाना घटनास्थळी रवाना करण्यात आलं आहे. मात्र, अपघात झालेलं ठिकाण गौरीमाई खर्क इथल्या अत्यंत दुर्गम जंगल भागात असल्याने बचाव कार्य अधिक जटिल झाले आहे. एसडीआरएफच्या टीम्स कठीण आणि उंच-खाचखळग्यांमधून मार्ग काढत घटनास्थळी पोहोचत आहेत.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिले – “रुद्रप्रयाग जिल्ह्यातील हेलिकॉप्टर अपघाताची अतिशय दु:खद बातमी समजली. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथक तत्काळ मदत व बचाव कार्यात गुंतलेले आहेत. मी बाबा केदारनाथकडे सर्व यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो.”

२ मे रोजी केदारनाथ मंदिराचे कपाट उघडल्यापासून ही पाचवी विमान दुर्घटना आहे. यापूर्वी ७ जून रोजी, एक दुसऱ्या हेलिकॉप्टरला उड्डाण करताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रुद्रप्रयाग-गौरीकुंड महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली होती. उतरतानाच त्या हेलिकॉप्टरचा पाठीमागचा भाग एका उभी असलेल्या कारला धडकला, तसेच हेलिकॉप्टर धोकादायक पद्धतीने इमारतीजवळ पोहोचले. त्या दुर्घटनेत सर्व पाच तीर्थयात्री सुरक्षित होते, मात्र पायलटला किरकोळ जखमा झाल्या होत्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा